नवी दिल्ली – किडनी (kidney) हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव मानला जातो. किडनी आपल्या शरीरातील टाकाऊ (waste) पदार्थ काढून टाकते. जर तुमच्या किडनीचे कार्य नीट सुरू नसते तेव्हा शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात. आरोग्य समस्यांना (health disease) अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. किडनी नीट काम करत नसेल तर ते कोणत्या लक्षणांवरून दिसू शकते, हे जाणून घेऊया.
जास्त थकवा जाणवणे
आरोग्य तज्ञांच्या सांगण्यानुसार, जर तुम्हाला कमी उर्जा जाणवत असेल किंवा लक्ष केंद्रित करण्यात त्रास होत असेल तर हे एक वाईट लक्षण असू शकते. किडनीच्या कार्याात गंभीर कमतरता झाल्यामुळे रक्तामध्ये विष आणि अशुद्धता तयार होऊ शकते. यामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
त्वचा कोरडी होणे व खाज सुटणे
निरोगी किडनी अनेक महत्त्वाचे कार्य करते. शरीराती टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव काढण्याचे कार्य किडनीद्वारे केले जाते. तसेच ते लाल रक्तपेशी तयार करण्यात आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. यासोबतच रक्तातील खनिजे योग्य प्रमाणात राखण्याचे कामही किडनी करते. कोरडी आणि खाज सुटलेली त्वचा हे खनिज कमतरता आणि हाडांच्या आजाराचे लक्षण असू शकते.
लघवी करताना रक्त येणे
लघवी करण्यासाठी रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करताना निरोगी किडनी सामान्यत: शरीरात रक्त पेशी ठेवतात, परंतु जेव्हा मूत्रपिंडाचे फिल्टर खराब होतात तेव्हा या रक्तपेशींमुळे स्त्राव होऊ शकतो. लघवी करताना रक्त येणे हे किडनीच्या आजाराच्या लक्षणा व्यतिरिक्त ट्यूमर, किडनी स्टोन किंवा एखाद्या संसर्गाचे लक्षण असू शकते.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)