नवी दिल्ली : प्रेमात पडलेले तरुण रात्रंदिवस मोबाईलवर बोलतात. संभाषण संपले तरी मेसेजद्वारे ते आपले प्रेम व्यक्त करतात. प्रेमात हे सर्वसामान्य मानले जाते. पण, सतत बोलण्याची आणि मेसेज करण्याची ही सवय खरे तर एक आजार आहे. एक मुलगी तिच्या प्रियकराला दिवसातून 100 पेक्षा जास्त वेळा फोन करायची. प्रियकरावर ती इतकी अवलंबून होती की तिला नेहमी प्रियकर तिच्याजवळ हवा होता. प्रियकर कुठे आहे? तो काय करतो? तो कोणासोबत आहे? याबद्दल तिला सतत अपडेट्स हवे होते. मात्र, परिस्थिती अधिक बिघडले. त्यामुळे दोघांनी डॉक्टरकडे जाणे योग्य मानले. डॉक्टरांच्या उपचारादरम्यान त्या मुलीला बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरने ( Love Brain Disorder ) त्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. चीनमध्ये असे एक प्रकरण समोर आले आहे.
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या मते बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही एक प्रकारची मानसिक आरोग्य समस्या आहे. याला भावनिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तिमत्व विकार देखील म्हटले जाऊ शकते. जर एखाद्याला ही समस्या असेल तर त्याला त्याच्या दैनंदिन कामांमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये आणि जीवनातील घटनांमध्ये समस्या येऊ शकतात. नोकरी आणि नातेसंबंध सांभाळण्यात अडचण येऊ शकते. बऱ्याच वेळा या समस्येला सामोरे जाण्यासाठी लोक जास्त प्रमाणात दारू किंवा अमली पदार्थांचा वापर करण्यास सुरवात करतात. अशा लोकांची मनःस्थिती अस्थिर असते. एक प्रकारे ते स्वतःबद्दल बेफिकीर होतात. जास्त राग किंवा अति प्रेम, भीती येऊ शकते. रिकामेपणा जाणवतो. मनोचिकित्सक किंवा मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन या आजारावर उपचार केले जाऊ शकतात.
बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरला सामान्यतः लव्ह ब्रेन डिसऑर्डर ( Love Brain Disorder ) म्हणून ओळखले जाते. या आजारामुळे चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात. दुसऱ्या अर्थाने समजले तर जेव्हा आपण कोणावर जास्त प्रेम करू लागतो आणि जेव्हा हे प्रेम इतके वरचढ होते की त्या व्यक्तीला सतत आपल्या सोबत पहावेसे वाटते. आपल्यासोबत राहावेसे वाटते, तेव्हा त्याला प्रेमाचा मेंदू म्हणतात. त्या मुलीच्या बाबत असे झाले की, मुलीला तिच्या प्रियकराकडून अशी अपेक्षा होती की, जेव्हा ती त्याला कॉल करेल किंवा मेसेज करेल तेव्हा तो तिच्या मेसेज आणि कॉलला लगेच प्रतिसाद देईल. मग, हळूहळू ती या विकारात बुडायला लागली.
बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डरवर मानसोपचारतज्ज्ञ किंवा मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन उपचार केले जाऊ शकतात. हा उपचार सुरू झाल्यानंतर लक्षणे सुधारण्यास वेळ लागू शकतो. बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर असलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या प्रियजनांनी धीर धरून उपचार करणे अव्सग्य्क आहे. या प्रकरणात काही प्रमाणात औषधेदेखील मदतीची भूमिका बजावू शकतात. काही लक्षणांमध्ये न्यूरोलेप्टिक आणि ॲटिपिकल अँटीसायकोटिक औषधे मदत करू शकतात.