मंकी पॉक्स आजार नेमका काय आहे ? सुरक्षेचे काय आहेत उपाय ?

| Updated on: Sep 09, 2024 | 4:41 PM

मंकी पॉक्स सदृश्य आजाराचा पहिला संशयित रुग्ण भारतात सापडला आहे. या आजाराचा विषाणू माकडापासून माणसात आल्याचे म्हटले जात आहे. या आजारावर अद्याप लस निर्माण झालेली नाही, तसेच हा आजार लवकर पसरत असल्याने काळजी घ्यावी असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

मंकी पॉक्स आजार नेमका काय आहे ? सुरक्षेचे काय आहेत उपाय ?
What is monkeypox? What are the security measures?
Follow us on

मंकी पॉक्स किंवा एमपॉक्स या आजाराचा संशयित रुग्ण भारतात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या आजारा संदर्भात नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने आपात्कालिन स्थिती जाहीर केली होती. त्यामुळे त्यानंतर आठवडाभरात मंकी पॉक्स आजाराचा रुग्ण भारतात सापडला आहे. या आजाराशी साधर्म्य दर्शविणारी लक्षणे या तरुणात आढळली आहेत. तसेच हा रुग्ण आफ्रीकन देशाचा दौरा करुन परतला असल्याने त्याला विलगीकरण करुन ठेवण्यात आले आहे. तसेच या आजाराची चाचणी करण्यासाठी टेस्ट किट्स देखील आता बाजारात येणार आहेत.आयसीएमआरने या किट्सना मंजूरी दिली आहे. काय आहे हा मंकी पॉक्स काय आहेत त्याची लक्षणे पाहूयात….

Mpox ( आधीचे नाव मंकी पॉक्स ) हा आजार मंकी पॉक्स नावाच्या व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस स्मॉल पॉक्स या आजाराला कारणीभूत असलेल्या (ज्याला आपण देवी म्हणतो ) व्हायरसच्या जात कुळीतलाच आहे. ज्यांना मंकी पॉक्स होतो त्यांच्या शरीरावर चट्टे किंवा पुरळ येतात. एमपॉक्स हा चिकनपॉक्सशी संबंधित नाही. हा एमपॉक्स हा झुनॉटिक डिसीज आहे. हा प्राण्याशी मानवाचा संपर्क आल्याने पसरत असतो. मध्य आणि पश्चिम आफ्रीकी देशात हा आजार नेहमी अधूनमधून येत असतो.

साथीचा आजार

जागतिक आरोग्य संघटनेने आफ्रीका खंडातील 12 देशात या मंकीपॉक्सची इमर्जन्सी घोषीत केल्यानंतर तीन आठवड्या्नंतर भारतात संशयित एमपॉक्स रुग्ण सापडला आहे. या आजारावर लस उपलब्ध नाही. तसेच हा आजार जरी प्राण्यापासून होत असला तरी नंतर तो माणसापासून माणसात पसरत असल्याने खळबळ उडाली आहे.

टेस्टींग किट तयार

एमपॉक्सविषयी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. या आजाराची टेस्टिंग कीट तयार केली जात आहे. सीडीएससीओंनी एमपॉक्सची चाचणी करण्यासाठी तीन टेस्टिंग किटना मंजूरी दिली आहे. आरटी-पीसीआर किटमध्ये पॉक्सच्या जखमांतून बाहेर येणाऱ्या तरल पदार्थांचे नमूने काढून तपासणीसाठी पाठविली जात आहेत. आयसीएमआरने देखील या किट्सना मंजूरी दिलीआहे.

घाबरण्याचे काही कारण नाही

या आजारावर सध्या कोणतीही लस बाजारात उपलब्ध नाही. आपल्या येथे पूर्वी देवी आजार होता. वा  स्मॉल पॉक्ससारखा हा मंकी पॉक्स आजार आहे.  तरी घाबरण्याचे विशेष काही कारण नसले तरी काळजी घ्यावी असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.

पश्चिम आणि मध्य आफ्रीकेतून सुरुवात

मंकी पॉक्स हा विषाणू नेमका कुठून पसरण्यास सुरुवात झाली याचा नेमका ठाव ठिकाणा काही कळलेला नाही. परंतू असे म्हटले जात आहे की मंकी पॉक्स काही प्राण्यांमधून मानव जातीत पसरला असावा. यात सन स्क्वीरल, माकडे, आफ्रीकन डॉरमाईस, उंदीर अशा सस्तन प्राण्यापासून तो मानवात आला असावा असे म्हटले जात आहे. पश्चिम आणि मध्य आफ्रीकेत या आजाराची सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.

या प्राण्यांची शिकार करताना हा व्हायरसचा माणसाशी संपर्क झाला असावा असे म्हटले जात आहे. किंवा या प्राण्याच्या स्राव किंवा लाळेद्वारे या आजाराचे विषाणू मानवाच्या शरीरात गेले असावेत असे म्हटले जात आहे. लहान प्राणी कोणत्याही बाह्य लक्षणाशिवाय या आजाराच्या विषाणूंना शरीरात घेऊन फिरत असतात. ज्यावेळी या विषाणूच्या प्रादुर्भावाने माकडे आजारी पडली तेव्हा त्यांच्यात मानवासारखीच लक्षणे आढळली आहेत.

आफ्रीकेबाहेर पहिल्यांदा हा आजार कधी झाला

साल 2003 मध्ये पश्चिम आफ्रीकेतील काही प्राण्यांचा घरात पाळलेल्या कुत्रे आणि पेटशी एका जहाजातून एकत्र आणताना संपर्क झाला होता. त्यावेळी अमेरिकेतील सहा राज्यात 47 जणांना मंकी पॉक्सचा संसर्ग झाला होता. त्यावेळी पहिल्यांदा आफ्रीकेच्या बाहेर या आजाराने वर्दी दिल्याचे म्हटले जात आहे. या प्राण्यांना आणि रुग्णांना ज्यावेळी विलगीकरण करुन ठेवल्यानंतर एमपॉक्स पसरणे आपोआप कमी झाले होते.

या प्राण्यांना अद्याप मंकी पॉक्स झाल्याचे आढळले नाही

मंकी पॉक्स व्हायरस माकड, उंदीर, खारुताई अशा सस्तन प्राण्यांना इन्फेक्ट करु शकतो. सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी किंवा उडणारे पक्षी यांना हा व्हायरस संसर्ग करु शकतो की नाही हे अद्याप उघडकीस आलेले नाही. आतापर्यंत तरी या प्राण्यांमध्ये तरी मंकी पॉक्स संसर्ग झाल्याचे तरी उघडकीस आलेले नाही.

प्राणी वाहक असू शकतात

अनेक प्राण्यांमध्ये जरी मंकी पॉक्सचा संसर्ग होत असला तरी त्यांच्या शरीरावरुन त्याची लक्षणे दिसतीलच असे नाही. प्रदुषित प्राणी मंकी पॉक्स व्हायरस माणसात आणि इतर प्राण्यांमध्ये पसरवितात. तसेच ज्या माणसांमध्ये मंकी पॉक्सचा संसर्ग होतो त्यांच्याकडून देखील प्राण्यांमध्ये पुन्हा हा आजार पसरू शकतो.

या द्वारे हा आजार पसरु शकतो

मंकीपॉक्स विषाणू हा शरीरावरील रॅशेस तसेच फोड यातील (एमपॉक्स) स्कॅब्स, क्रस्ट्स, द्रवपदार्थ) आणि संक्रमित शरीरातील द्रवपदार्थ, श्वसनातील स्राव, आणि लघवी आणि मलमूत्रामधून माणसात देखील पसरू शकतो.

पाळीव प्राण्यांना धोका आहे का ?

मंकी पॉक्स पाळीव प्राणी उदा. कुत्रा, मांजर यांना संसर्ग करु शकतो का ? याबाबत अद्याप काही केस आढळलेल्या नाहीत. परंतू या प्राण्यांमध्ये देखील मंकी पॉक्सचा संसर्ग होऊ शकतो असे म्हटले जात आहे. ज्या माणसाला मंकी पॉक्स झाला आहे ते पाळीव प्राण्यांच्या अत्यंत जवळ गेले तर त्यांच्याकडून त्यांच्या पाळीव प्राण्यांना देखील या आजाराची लागण होऊ शकते.
जर मंकी पॉक्सचा संसर्ग झाला असेल अशा व्यक्तीने पाळीव प्राण्यांच्या जवळ गेले, त्याला मिठी मारली, किंवा किस केले, एकत्र पाळीव प्राण्यासोबत एकत्र झोपले किवा अन्नपदार्थ शेअर केले तर पाळीव प्राण्यांमध्ये देखील या आजाराचे विषाणू पसरू शकतात.

साल 2022 पासून ग्लोबल एमपॉक्स आऊटब्रेक झाल्यानंतर आतापर्यंत कोणत्याही पेट किंवा इतर प्राण्यांमध्ये मंकी पॉक्सचे विषाणूबाधा झाल्याचे आढळलेले नाही.

 मंकी पॉक्स झाला तर लाडक्या प्राण्यांची काळजी कशी घ्यायची ?

पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांना मंकी पॉक्स होऊ नये यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी ? तुम्हाला जर मंकी पॉक्सचा संसर्ग झाला आहे तर तुम्ही विलगीकरणात राहा. आणि तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यास तुमच्या पासून वेगळे राहणार्‍या मित्रांना किंवा नातलगांना सांगा. तुम्ही संपूर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर घराला संपूर्ण निर्जंतवणूक कर आणि त्यानंतरच प्राण्यांना त्या घरात प्रवेश द्या.

मंकी पॉक्स पासून जादा संवेदनशील असलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याची गरज आहे. अशा संवेदनशील व्यक्तीने mpox झालेल्या व्यक्तीच्या पाळीव प्राण्यांची काळजी घेऊ नये. उदाहरणार्थ खालील व्यक्तीने अशा पाळीव प्राण्याची काळजी घेऊ नये –

  1. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता अत्यंत नाजूक आहे
  2.  गर्भवती महिला
  3. लहान मुले
  4. ज्यांना एटोपिक त्वचा रोग किंवा एक्झिमा आहे
  5.  तुमच्या पाळीव प्राण्यांना एमपॉक्स झाल्याचा तुम्हाला संशय आहे ?
  6. तुमच्या पाळीव प्राण्यांना जर रॅशेस, पुरळ,सूज आली असेल नाक आणि डोळ्यांतून स्राव येत असतील किंवा ताप पॉक्ससारखे त्वचेवर पुरळ किंवा फोड आले असतील तर सावध व्हा

एमपॉक्स झालेल्या किंवा संशयित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात जर तुमचे पाळीव प्राणी आले असतील तर सावधानता बाळगा. एमपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर 21 दिवसांत जर तुमच्या घरातील पाळीव प्राणी आजारी पडले तातडीने तुमच्या प्राण्यांना पाळीव प्राण्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जा.

आजारी प्राण्यांना तुमच्या इतर पाळीव प्राण्यांपासून वेगळे ठेवा, संसर्ग झालेल्या प्राण्यांचा आणि माणसांचा 21 दिवसांपर्यंत संपर्क होऊ देऊ नका. किंवा जोपर्यंत तुमच्या प्राण्यांचे डॉक्टर तुमचा पेट जोपर्यंत संपूर्ण बरा झालेला असल्याचे जोपर्यंत जाहीर करीत नाहीत तोपर्यंत त्याला घरात आणू नका.आजारी प्राण्याच्या स्वच्छता करताना तुमचे हात सातत्याने धुवा, तुमची त्वचा संपूर्णपणे कव्हर होईल असे कपडे परिधान करा. इन्फेक्टेट प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तू, फूड डिशेस, बेड्स आणि इतर आयटमना निर्जंवणूक करा.

कोणत्या सस्तन प्राण्यांना mpox विषाणूची लागण होऊ शकते याबद्दल अद्यापही संशोधक चाचपडत आहेत. त्यामुळे कोणत्याही सस्तन प्राण्याला एमपॉक्सची लागण होऊ शकते असे गृहीत धरुनच काळजी बाळगण्याचे धोरण स्विकारण्यात येत आहे.

संशोधक मंकी पॉक्स या आजाराबाबत अजूनही शिकत आहेत. त्यामुळे कोणत्याही सस्तन प्राण्याला मंकी पॉक्सचा संसर्ग होऊ शकतो असे आपण गृहीत धरले पाहिजे.

खालील तक्ता दर्शवितो की कोणत्या प्राण्यांना मंकी पॉक्सचा धोका असू शकतो

ग्राउंडहॉग

मार्मोट्स

चिंचिला ( Chinchilla )

खारुताई

हॅमस्टर्स

हेज हॉग

जायंट पाऊच रॅट्स

गियाना पिग्स

माईस

रॅट्स

श्रुज ( चिचुंद्री सारखा प्राणी )