मुंबईः ट्विटरची (Twitter) मालकी मिळाल्यानंतर एलन मस्क यांच्या नव-नवीन निर्णयांमुळे नेट यूझर्सना एकानंतर एक धक्के बसत आहेत. स्पेसएक्स, टेस्ला आणि ट्विटरसारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांना आधीपासूनच तंत्रज्ञानात खूप रस आहे. त्यांची आणखी एक कंपनी तंत्रज्ञानावर काम करते. तिचं नाव आहे न्यूरालिंक. न्यूरल इंटरफेस टेक्नोलॉजी (Technology) विकसित करणारी ही कंपनी सध्या खूपच चर्चेत आहे.
त्याचं कारण म्हणजे कंपनीने एक खास चिप बनवली आहे. माणसाच्या मेंदूत ही चिप बसलता येते. यामुळे माणसाच्या क्षमता वाढतात.
विशेष म्हणजे एलन मस्क स्वतःच ही चिप आपल्या मेंदूत बसवून घेणार आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या निर्णयाची तुफान चर्चा आहे.
न्यूरालिंकशी संबंधित काही व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओत एक माकड आपल्या मेंदूच्या मदतीने टायपिंग करते. मस्क यांची कंपनी अनेक वर्षांपासून या प्रोजक्टवर काम करते. या खास प्रोजक्टची बरीच वैशिष्ट्ये आहेत.
खरं तर एलन मस्क यांनी स्वतःच्याच मेंदूत ही चिप लावण्याचं वक्तव्य स्पष्टपणे केलेलं नाही. पण स्वतःचा इंटरेस्ट दाखवला आहे. Ashlee Vance यांच्या ट्विटला रिप्लाय करताना त्यांनी ही माहिती दिली.
Musk says 6 months to first human implant
— Ashlee Vance (@ashleevance) December 1, 2022
यूझरने लिहिलं- एलॉन मस्क यांनी ब्रेन इम्प्लांट करण्याचा संकल्प केलाय. त्याच्या डेमोच्या वेळी मस्क आपल्याच मेंदूत ही चिप लावणार आहेत. याला उत्तर देताना मस्क यांनी हो, असं म्हटलंय.