मुंबई : कोरोनापासून मुक्त होण्यासाठी भारताने पूर्णपणे कंबर कसली आहे. देशातील लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहचवण्याच्या जोरदार तयारी सरकारने सुरू केली आहे. तथापि, भारतात अद्याप कोरोना लस वापरण्यास मान्यता देण्यात आलेली नाही. परंतु, सरकार देशात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’ चालवणार आहे. 28 आणि 29 डिसेंबर रोजी सरकार चार राज्यात लसीकरणाची ‘ड्राय रन’ घेणार आहे. यामध्ये पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांचा समावेश आहे. या राज्यांच्या दोन जिल्ह्यात ड्राय रन केली जाईल. कोरोना लसीची ही ‘ड्राय रन’ म्हणजे नेमकं काय? यात काय केलं जाणार हे आपण जाणून घेणार आहोत (What is the Dry Run of Corona vaccine).
कोणतीही लस लोकांना देण्यापूर्वी तिची ‘ड्राय रन’ घेतली जाते. या दरम्यान जर या लसीमध्ये काही समस्या किंवा त्रुटी आढळल्यास, नंतर त्यात सुधारणा केली जाऊ शकते. प्रत्यक्ष लसीकरणाप्रमाणेच ‘ड्राय रन’ची प्रक्रिया केली जाते. तथापि, या ड्राय रन दरम्यान लोकांना लसीचा डोस दिला जात नाही. केवळ त्या लोकांचा डेटा अपलोड केला जातो. मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेंट आणि ऑनलाइन डेटा सिक्युरिटी यासारख्या गोष्टींच्या चाचण्या घेतल्या जातात.
ड्राय रन दरम्यान डेटा कनेक्ट करण्यासाठी आणि त्याचे परीक्षण करण्यासाठी सरकारने ‘को-विन’ नावाचे मोबाइल अॅप तयार केले आहे. यामध्ये ड्राय रनशी संबंधित सर्व माहिती अपलोड केली जाईल. यामुळे लस वितरणाची थेट देखरेख करण्यास अनुमती मिळेल. यामध्ये लोकांना देण्यात आलेल्या लसीच्या डोसचा मागोवा घेतला जाईल. या लसीचे दोन डोस घेतल्यावर, यातून तुम्हाला डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. आपण लसीचा संपूर्ण डोस घेतल्याचा हा पुरावा असेल (What is the Dry Run of Corona vaccine).
पंजाबच्या राज्य माहिती व जनसंपर्क विभागानुसार केंद्र सरकारने कोरोना लसीच्या ड्राय रनकरता पंजाबच्या लुधियाना आणि शहीद भगतसिंग नगरची निवड केली आहे. दोन्ही जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीचे ड्राय रन होणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणादरम्यान 2,360 सहभागींना प्रशिक्षण देण्यात आले आहे, त्यात राज्य लसीकरण अधिकारी, कोल्ड चेन अधिकारी, आयईसी अधिकारी यांचा समावेश आहे.
आतापर्यंत भारतातील तीन फार्मा कंपन्यांनी त्यांच्या लसीच्या तातडीच्या वापरासाठी मान्यता मागितली आहे. फायझर या लसीच्या शर्यतीत आघाडीवर होती. 4 डिसेंबर रोजी त्यांनी लसीच्या तातडीच्या वापरासाठी भारत सरकारची परवानगी मागितली होती. भारतात, ऑक्सफोर्ड लस तयार करणाऱ्या सीरम संस्थेनेही आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) सहकार्याने लस बनवणारी हैदराबादची कंपनी ‘भारत बायोटेक’ यांनीही लसीचा त्वरित वापर करण्यासाठी अर्ज केला आहे.
(What is the Dry Run of Corona vaccine)
ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना स्ट्रेनचे सात लक्षणे कोणती? वाचा सविस्तरhttps://t.co/aJtMGzVodC #CoronavirusStrain #coronavirus #Coronastrain
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020