Health: बारीक लोकांना Type 4 Diabetes चा धोका जास्त? ‘ या ‘ वयात होतो परिणाम

| Updated on: Sep 05, 2022 | 4:55 PM

सर्व प्रकारच्या मधुमेहामुळे शरीरात इन्सुलिन प्रतिरोध ( रेझिस्ट्न्स) निर्माण होतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतो. वेगवेगळ्या प्रकारच्या मधुमेहावर वेगवेगळ्या प्रकारे उपचार केले जातात.

Health: बारीक लोकांना Type 4 Diabetes चा धोका जास्त?  या  वयात होतो परिणाम
मधुमेह
Image Credit source: Social Media
Follow us on

What is Type 4 Diabetes: आजच्या काळात मधुमेह (Diabetes) ही आरोग्याची सर्वात मोठी (Health Problem) समस्या बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत अनेक जणांचा या समस्येशी संघर्ष सुरू आहे. मधुमेहाचा शरीराच्या सर्व अवयवांवर वाईट परिणाम (bad effect on Body) होतो. त्यामुळे हृदयविकार, मानसिक समस्या यांसह इतरही अनेक समस्या उद्भवतात. मधुमेह अनेक प्रकारचा असतो. बहुतांश लोक टाइप 2 आणि टाइप 1 मधुमेहाच्या जाळ्यात अडकतात. तर काही लोकांना टाइप 3 आणि टाइप 4 मधुमेहाचा त्रास होतो. टाइप 4 मधुमेह (Type 4 Diabetes) म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? या मधुमेहामुळे कोणत्या वयोगटातील लोक प्रभावित होतात आणि त्याचे कारण काय असते, हे जाणून घेऊया.

टाइप 4 मधुमेह म्हणजे काय ?

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, टाइप 4 मधुमेह हा वृद्ध लोकांमध्ये इन्सुलिनच्या प्रतिरोधामुळे (Resistance) होणारा आजार आहे. हा आजार वयस्कर व्यक्तींना होतो, ज्यांचे वजन जास्त नसते व ते बारीक असतात. लठ्ठपणा हे टाइप 2 मधुमेह होण्यामागचे कारण समजले जाते. मात्र टाइप 4 मधुमेहात तसे काही नसते. टाइप 4 मधुमेह नेमका का होतो, त्याचं नेमकं कारण काय, हे शोधण्याचा प्रयत्न सध्या शास्त्रज्ञ करत आहेत. वाढत्या वयामुळेही हा आजार होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. रोगप्रतिकारकशक्तीच्या पेशींच्या अधिक प्रमाणातील निर्मिती झाल्यासही टाइप 4 मधुमेह होऊ शकतो, अशी माहिती 2015 साली करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आली होती. हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला होता.

टाइप 4 मधुमेहाची लक्षणे –

टाइप 4 मधुमेहाची लक्षणे ही अन्य मधुमेहाच्या लक्षणांप्रमाणेच असतात. मात्र हा मधुमेह कमी वजनाच्या लोकांमध्ये होतो, त्यामुळे त्याचा अंदाज लावणे थोडे कठीण जाते. याची काही लक्षणे इतर आजारांच्या लक्षणांसारखीच असतात. त्यामुळे चाचण्या केल्यानंतरच या मधुमेहाबद्दल समजू शकते. प्रमुख लक्षणे जाणून घेऊया –

हे सुद्धा वाचा
  1. खूप थकायला होणे.
  2. खूप भूक आणि तहान लागणे
  3. अस्पष्ट दिसू लागणे.
  4. जखमा भरून न येणे.
  5. सतत लघवी लागणे
  6. अचानक वजन कमी होणे.

काय आहे टाइप 4 मधुमेहावरील उपचार ?

आत्तापर्यंत, टाइप 4 मधुमेहावर कोणताही अचूक उपचार सापडलेला नाही. एखादे ॲंटीबॉडी औषध विकसित करण्यास सक्षम ठरतील अशी आशा संशोधकांना आहे. हे औषध शरीरातील रेग्युलेटरी टी-सेल्स (पेशी) कमी करण्यासाठी आणि टाइप 4 मधुमेहावर उपचार करण्यासाठी मदत करू शकेल.