नवी दिल्ली : तुम्हालाही दिवसभर डोकेदुखीचा त्रास होतो का? झोपल्यानंतर-उठल्यानंतर- किंवा नियमित खाण्यानंतरही, तीव्र डोकेदुखीचा त्रास (Chronic Headache) झाल्यामुळे तुम्हालाही डोकं धरून बसायला लागत आहे का ? अशावेळी सावधगिरी बाळगण्याची गरज असते, कारण किरकोळ स्वरूपाची डोकेदुखी देखील अनेक परिस्थितींमध्ये गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. पौष्टिक आहार न घेणे, नियमित झोप न घेणे, उन्हात फिरणे, डोळ्यांना बराच वेळ ताण देणे इत्यादी गोष्टी या साधारणतः डोकेदुखीसाठी (Headache causes)कारणीभूत ठरू शकतात.
पण जीवनशैलीत आवश्यक बदल करूनही तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे ठरते. रक्तदाब, ब्रेन ट्यूमर, रक्त गोठणे, स्ट्रोक इत्यादी गंभीर आजार देखील वारंवार डोकेदुखीच्या तक्रारीचे मुख्य कारण मानले जाऊ शकतात. त्यावर वेळीच उपचार केले नाही तर परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडण्याची शक्यता असते. पण काही गंभीर आजारामुळेच तुम्हाला डोकेदुखी असेल हे आवश्यक नाही. अशा वेळी कोणतीही वेदनाशामक औषधे आणि प्रतिजैविके न घेताही तुम्ही या वेदनापासून मुक्त होऊ शकता.
वारंवार डोकं का दुखतं ?
डोकेदुखीच्या सामान्य तक्रारीला सामोरे जाण्यामागे अनेक कारणे असू शकतात. डोकेदुखीच्या समस्येची मुख्य कारणे –
– झोपेचा अभाव
– पोषणाचा अभाव
– बसण्याची किंवा चालण्याची खराब पोझिशन
– निकोटीनचे सेवन करणे
– वाइन पिणे अथवा मद्यपान करणे
– टेन्शन
– डिहायड्रेशन
– मान आणि खांदा दुखणे
– डोळ्याची समस्या
डोकेदुखीमागील गंभीर कारणे
– रक्तदाब खूप जास्त आहे
– ब्रेन ट्यूमर
– मेंदूचा सूज
– मेंदू संसर्ग
– पाठ किंवा मानेला सूज येणे
– सायनस
– रक्त गोठणे
– मेंदूमध्ये रक्तस्त्राव
डोकेदुखी बरी करण्याचे काही घरगुती उपाय
– पाणी प्यायला ठेवा
– नियमितपणे झोपा
– अरोमाथेरपी किंवा आवश्यक तेलांचा वापर
– तुळशी आल्याचा चहा
– गरम किंवा थंड पाण्याचे कॉम्प्रेस
– जीवनशैली बदल
– बसण्याची किंवा चालण्याची योग्य मुद्रा
– गरम किंवा थंड पाण्याने शेका
– जीवनशैलीत बदल करा
– मानेच्या वेदना दूर करा
– कॉफी प्या
– ॲक्यूप्रेशर
– गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यावे
– सफरचंद खा
– लवंग तेलाने मालिश करा
डॉक्टरांना कधी दाखवावे ?
– कोणतीही शारीरिक हालचाल केल्यानंतर लगेच डोकेदुखी होत असेल तर
– जीभ लटपटू लागते, चालताना पाय अडखळतात.
– जर अचानक डोकेदुखीने तीक्ष्ण आणि गंभीर स्वरूप धारण केले तर
– स्मरणशक्ती खराब होते.
– उलट्या होणे, चक्कर येणे आणि मान ताठ होणे
– बरेच दिवस डोकं दुखत असेल तर
– कोणत्याही कारणाशिवाय सतत डोकेदुखी.
– झोपतानाही डोकं दुखत असेल तर