एकेकाळी हृदयाचा आजार केवळ वृद्धांना व्हायचा. परंतू अलिकडील आपले रहाणीमान बदल्याने वाढता ताण-तणाव, बैठी कामाची शैली यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्याने ऐन तारुण्यात हृदयविकाराचे आजार होऊ लागले आहेत. गेल्या दशकात कमी वयाच्या तरुणाचे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाले आहेत. अवघ्या तिशीत हार्ट सर्जरींची वेळ येत आहे. 30 ते 35 वयात बायपास सर्जरी करणाऱ्यांची संख्या वाढली असून हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. परंतू कमी वयातच हृदय कमजोर का होत आहे. तिशीतच का बायपास सर्जरीची वेळ का येत आहे. यापूर्वी 50 वा 60 या वयात बायपास सर्जरीची व्हायची आता तिशीतच ही वेळ येत असल्याने जर विमा नसेल तर कुटुंबच आर्थिक संकटात सापडत आहे.
हृदयाला रक्त पुरविणाऱ्या रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार झाल्यानंतर बायपास सर्जरीचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात असतो. हार्ट अटॅक आल्यानंतर किंवा हार्ट अॅटॅकच्या धोक्यापासून वाचण्यासाठी डॉक्टर बाय पास सर्जरीचा सल्ला देतात. हार्टमधील नसांमध्ये ब्लॉकेज कोलेस्ट्रॉलमुळे देखील होत असतो. तसेच रक्ताची गुठली झाल्याने देखील हृदयाचा रक्त पुरवठा बंद पडू शकतो. त्यामुळे बायपास सर्जरीचे प्रमाण खूपच वाढले आहे.
जेवणाच्या वाईट सवयी आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे देखील हृदयासंबंधित आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे राजीव गांधी हॉस्पिटलचे कार्डीओजी विभागाचे डॉ.अजित कुमार यांनी म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांत तिशीत हार्ट अॅटॅक आणि हार्ट फेल होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे.कोरोना काळानंतर यात जास्त संख्या वाढली आहे.त्यामुळे कमी वयात बायबास सर्जरी करावी लागत असल्याचे डॉ. अजित कुमार यांनी म्हटले आहे.
बदलती जीवन शैली, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान आणि दारुचे व्यसन यामुळे हृदय विकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अलिकडे तिशीत हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण खूपच वाढल्याचे गुरुग्राम येथील नारायणा हॉस्पिटलचे प्रोग्रॅम हेड कार्डियक सायन्सेसचे डॉ. हेमंत मदान यांनी म्हटले आहे.
मानसिक तणाव, अपुरी झोप याचा देखील हृदयावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे. हार्टच्या आजाराविषयी लोकांमध्ये जागरुकता नाही. छातीत दुखू लागल्यावर अचानक धाप लागण्याच्या तक्रारीकडे लोक दुर्लक्ष करतात. लोकांना गॅसेस किंवा एसिडीटीचा त्रास वाटतो. परंतू याकडे दुलर्क्ष करु नये असे दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी विभागातील प्रोफेसर डॉ.तरुण कुमार यांनी म्हटले आहे.
कमी वयात हार्ट अटॅक येण्याची कारणासाठी ब्लड प्रेशर देखील जबाबदार आहे. जामा जर्नलच्या साल 2021मधील एक संशोधनात म्हटले आहे की भारतात चार पैकी एका व्यक्तीला ब्लड प्रेशरच्या आजाराने ग्रस्त आहे. यातील 30 टक्के लोक कमी वयाचे आहेत.
शुगर लेव्हल नियंत्रणात राखा
आहाराच्या वाईट सवयी सुधारा
ताण-तणापासून दूर राहा
दररोज व्यायाम करा