नवी दिल्ली : कोविड-19 विषाणूच्या नियंत्रणासाठी बनवण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सचे (NTF) प्रमुख डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी आता घरातही मास्क घालण्याची वेळ आल्याचं म्हटलंय. यावरुन कोरोना संसर्गाचं गांभीर्य आणि त्याचा धोका लक्षात येऊ शकतो. टास्क फोर्सच्या या सूचनेनंतर घरात मास्क घालण्याची वेळ येण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. याच प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा खास आढावा (Why Mask are important in House to prevent Corona also know all about it).
भारतात सोमवारी (26 एप्रिल) रोजी 3 लाख 52 हजार 991 नवे कोरोना रुग्णा सापडले. याशिवाय 2 हजार 812 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. सध्या देशात एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 28 लाख 13 हजार 658 वर पोहचली आहे. त्यातच नॅशनल टास्क फोर्सने घरातही मास्क घालण्याची सूचना करणं परिस्थितीचं गांभीर्य वाढवणारं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक असल्याचं टास्क फोर्सने म्हटलंय.
घरात मास्क घालणं का महत्त्वाचं?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग घराघरात पोहचला आहे. यातील काहींना लक्षणं दिसतात तर काहींना नाही. ज्यांना लक्षणं दिसतात त्यांना ओळखून विलगीकरणा तरी ठेवता येतं मात्र ज्यांना कोणतीही लक्षणं दिसत नाहीत ते कोरोना विषाणूचे स्प्रेडर ठरतात. म्हणूनच विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. नव्या कोरोना विषाणूंची संसर्ग क्षमता खूप जास्त आहे. त्यामुळे घरातील एकाला जरी कोरोना संसर्ग झाला तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून संपूर्ण घर कोरोना बाधित होण्याचं प्रमाण वाढलंय.
लक्षणं नसलेल्या कोरोना बाधितांकडून सर्वात मोठा धोका
कोरोना बाधित व्यक्ती शिंकल्यानंतर नाका तोंडातून निघणारे सुक्ष्म ड्रॉपलेट घरात पसरतात. यामधूनच हा विषाणू घरातील एका सदस्याकडून इतर सर्व सदस्यांपर्यंत पोहचतो आणि मोठ्या प्रमाणात संसर्ग करतो. हे कण हवेतून इतरत्रही पसरत आहेत. हे रोखण्यासाठीच घरातही मास्क घालण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
कुटुंबाला वाचवायचं असेल तर घरातही मास्क गरजेचा
डॉक्टर पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील मोठ्या लोकसंख्येत कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हेच लोक कोरोना संसर्गात सर्वात धोकादायक ठरत आहेत. हे लक्षण नसलेले लोक बोलताना त्यांच्या तोंडातून निघणारे ड्रॉपलेट्सही संसर्गाचं कारण ठरत आहेत. त्यामुळेच संपूर्ण कुटुंबाला कोरोना संसर्गाचा धोका वाढलाय.
हेही वाचा :
कर्नाटकमध्ये नवा प्रयोग, मास्क फेकल्यानंतर थेट झाड उगवणार; जाणून घ्या नेमकं कसं ?
मास्कवरुन वाद, तरुणाने खुलेआम पोलीस अधिकाऱ्याच्या थोबाडीत लगावली, व्हिडीओ व्हायरल
Video: मास्क का घातला नाही म्हणून जोडप्याला पोलिसांनी ‘हटकलं’, तर बया थेट ‘किसवर’ आली, बघा काय घडलं?
व्हिडीओ पाहा :
Why Mask are important in House to prevent Corona also know all about it