नवी दिल्ली : खराब जीवनशैलीमुळे अनेक प्रकारचे आजार लोकांना त्रास देत आहेत. अशा स्थितीत तुम्ही युरिक ॲसिड (uric acid) वाढण्याचे बळी होऊ शकता. ज्यामुळे आणखी अनेक गंभीर आजार तुम्हाला घेरू शकतात. मुळात युरिक ॲसिड म्हणजे नेमके काय, त्याचे शरीरातील महत्व (importance) काय असते व त्याची पातळी वाढल्यास शरीरावर काय दुष्परिणाम (side effects) होऊ शकतात, या सर्वांची सविस्तर माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते.
युरिक ॲसिड म्हणजे नेमके काय ?
आपल्या शरीरात अनेक प्रकारचे अवयव काम करतात, ज्यामध्ये किडनी महत्त्वाची भूमिका बजावते. ती आपल्या शरीरात तयार झालेले अनेक प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. या रसायनांपैकी एक म्हणजे युरिक ॲसिड. थोडक्यात सांगायचे झाले तर यूरिक ॲसिड हे एक रसायन आहे. जे शरीरातील प्युरिनच्या विघटनाने तयार होते. सामान्यत: मूत्रपिंड मूत्राद्वारे फिल्टर करून कार्य करते. परंतु जेव्हा ते शरीरात जास्त होते, तेव्हा मूत्रपिंड ते व्यवस्थित फिल्टर करू शकत नाहीत. यामुळे यूरिक ॲसिडचे क्रिस्टल्स तुटतात आणि शरीराच्या सांध्यांमध्ये जमा होऊ लागतात. म्हणजेच जर त्याचे प्रमाण वाढले तर ते काढून टाकणे किडनीला कठीण होते.
युरिक ॲसिड वाढल्यामुळे नेमके काय होते ?
जर आपल्या शरीरामध्ये नेहमी युरिक ॲसिड वाढत असेल तर अशावेळी आपल्याला हाय ब्लडप्रेशर (High BP) , सांधेदुखी उठता – बसताना त्रास होणे, अंगावर सूज येणे ,यासारख्या समस्या उद्भवतात. तसेच काहीवेळेस किडनीचे आजार हृदयविकाराचा झटका यासारखे धोकादायक आजारही तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. अनेकदा युरिक ॲसिड वाढल्याने आपल्याला लघवी करताना त्रास होतो. अनेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की जर तुम्हाला युरिक ॲसिडची समस्या भेडसावत असेल तर तुम्ही लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण या आजाराकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास किडनी निकामी होऊ शकते.
या पदार्थांच्या सेवनामुळे वाढते युरिक ॲसिड
तूरडाळ आणि उडदाची डाळ खाल्ल्याने शरीरात ॲसिडचे प्रमाण वाढते कारण या कडधान्यांमध्ये जास्त प्रमाणात असते. जर तुम्हाला युरिक ॲसिडची समस्या असेल तर या कडधान्य जास्त प्रमाणात खाणे टाळण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे मासे आणि अल्कोहोल किंवा गोड पेये यांचे अतिसेवन केल्यामुळे तुमच्या शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते.
युरिक ॲसिड पासून वाचण्याचे उपाय
युरिक ॲसिड वाढण्याची समस्या टाळायची असेल तर प्युरीनयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा, तसेच अनावश्यक औषधे घेणे टाळा, शरीराच्या वजनाकडे विशेष लक्ष द्या. यासोबतच मद्य आणि साखरयुक्त पेयांपासून दूर राहा. आपल्या आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करा. यासोबतच स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून सुमारे 2 ते 3 लीटर पाणी प्या. दुसरीकडे, जर तुम्हाला युरिक ॲसिड नियंत्रित करायचं असेल, तर शारीरिक हालचाली हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग मानला जातो. तुमच्या दिनचर्येत 30 मिनिटांचा व्यायाम समाविष्ट करण्याची खात्री करा.