व्यसनामुळे माणसाच्या शरीराबरोबरच त्याचे जीवनही उद्ध्वस्त होते. आपल्या आजूबाजूला अनेक घटना आपण ऐकतो. यातील बहुतांश घटनांमध्ये गुन्हेगार (Criminal) हा नक्कीच कोणत्या ना कोणत्या अंमली पदार्थाच्या व्यसनाखाली असतो. आजच्या काळात बाजारात अशी अनेक रासायनिक उत्पादने आहेत ज्यातून लोक नशा करत आहेत. रंग, कफ सिरप, पेट्रोल, टायर पंक्चर ट्यूब, नेलपॉलिश यांचाही नशेत वापर केला जातो. नुकतीच एक विचित्र घटना समोर आली आहे. तुम्हाला ही विचित्र वाटेल, पण पश्चिम बंगालमधील तरुण कंडोमपासून नशा (Intoxication from condoms) करीत आहेत, तुम्हाला विश्वास बसणार नाही… पण, हे सत्य आहे. पश्चिम बंगालमध्ये कंडोमची विक्री अचानक वाढल्याने बाजारातून कंडोम संपले आहेत. फ्लेवर्ड (Flavored) कंडोमच्या मागणीत त्यामुळे प्रचंड वाढ होऊन कंडोम पासून नशा होत असल्याचे जाणून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. जाणून घ्या, तरुणाई कंडोमची नशा कशी करतात.
पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमधील तरुणांमध्ये कंडोमचे व्यसन खूप लोकप्रिय झाले आहे. ते बाजारातून फ्लेवर्ड कंडोम घेतात आणि गरम पाण्यात तासभर भिजत ठेवतात. एक तासानंतर, ते पाणी पितात, ज्याची नशा सुमारे 10 ते 12 तास टिकते. वास्तविक, दुर्गापूरमध्ये अनेक विद्यार्थी राहतात जे घरापासून दूर वसतिगृहात राहतात. वसतिगृहात राहून त्यांना सिगारेट, दारू अशा अनेक प्रकारच्या नशेचे व्यसन लागले आहे. अल्कोहोल आणि इतर नशा कंडोमपेक्षा खूप महाग आहेत. ते त्यांच्या खिशातून सहज कंडोम काढू शकतात आणि ते घेण्यासाठी त्यांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचीही गरज नसते. परिणामी विद्यार्थी फ्लेवर्ड कंडोमची नशा करत आहेत.
फ्लेवर्ड कंडोमचा वापर नशा म्हणून केला जात आहे, असा खुलासा एका विद्यार्थ्याने केला आहे. वास्तविक, पश्चिम बंगालमधील दुर्गापूर सिटी सेंटर, विधान नगर, बेनाचिटी आणि मुचीपारा, सी-झोन, ए-झोन दुर्गापूर भागात कंडोमची मागणी अधिक वाढली होती. विक्री वाढू लागल्यावर एका दुकानदाराने विद्यार्थ्याला याबाबत विचारले. जेव्हा दुकानदाराने त्याच्या नियमित ग्राहकाला विचारले, की तो दररोज कंडोम का घेऊन जातो, तेव्हा त्याने सांगितले, की तो मद्यपान करण्यासाठी दररोज कंडोम खरेदी करतो. दुर्गापूरमधील एका मेडिकल दुकानदार जयदेव कुंडू सांगतात, की कंडोमची विक्री अचानक वाढली होती. कॉलेज कॅम्पसमध्ये फक्त विद्यार्थीच जास्त कंडोम खरेदी करत असल्याचे आमच्या लक्षात आले. पहिल्या दिवशी कंडोमची केवळ 3 ते 4 पाकिटे विकली गेली होती. मात्र, आज दुकानांमध्ये फ्लेवर्ड
कंडोमची नशा खूप धोकादायक आहे
रसायनशास्त्राचे शिक्षक नुरूल हक यांच्या मते, फ्लेवर्ड कंडोमच्या नशेत विषारी संयुगे असू शकतात, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे त्याची नशा टाळावी. सध्या तरुणांना नशा करणे चांगले वाटत असले तरी भविष्यात त्याचे गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात.
विचित्र व्यसनाच्या आहारी गेलेल्या या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. इंडिया टुडेशी बोलताना, दुर्गापूर आरई कॉलेज मॉडेल स्कूलमधील रसायनशास्त्राचे शिक्षक नुरुल हक यांनी सांगितले की, कंडोम जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याची चव पाण्यात येते. जर कोणी ते प्यायले तर त्याची नशा होते. कारण फ्लेवर्ड कंडोमच्या फ्लेवरमध्ये सुगंधी संयुगे असतात. पाण्यात भिजल्यावर, चवीचे सेंद्रिय रेणू अल्कोहोल कंपाऊंडमध्ये मोडतात आणि अल्कोहोलसारखे कार्य करतात. याबाबत आजतक हिंदीने सविस्तर वृत्त प्रसारीत केले आहे.