Health : हिवाळ्यात मेकअप केल्यावर नाही फुटणार त्वचा, फक्त करा ही एक गोष्ट

| Updated on: Nov 22, 2023 | 9:00 PM

Winter Makup Tips : मेकअप केल्यानंतर त्वचेवर क्रॅक दिसतात त्वचा रफ दिसते. तसेच त्वचा सुंदर दिसण्याऐवजी ती घाण दिसते, त्यामुळे हिवाळ्यात मेकअप केल्यानंतर अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तर आता या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण काही अशा टिप्सबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे स्त्रियांना हिवाळ्यात मेकअप करणं सोपं जाईल आणि त्यांचा चेहरा ग्लो करेल.

Health : हिवाळ्यात मेकअप केल्यावर नाही फुटणार त्वचा, फक्त करा ही एक गोष्ट
Follow us on

मुंबई : सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये आपली त्वचा खूप कोरडी होते. यामुळे अनेक त्वचेची संबंधित समस्या निर्माण होतात. पण थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. त्यात स्त्रियांना मेकअप करणं खूप गरजेचं असतं, मग थंडीच्या दिवसांमध्ये कोरड्या त्वचेवर मेकअप करणं महिलांना कठीण जातं. मग पार्टी असो फंक्शन असो किंवा ऑफिसला जाताना असो मेकअप करताना काही वेळात त्वचा खूप कोरडी दिसते. त्यामुळे महिलांना कोरड्या त्वचेवर मेकअप करणं ही मोठी समस्या बनते.

हिवाळ्यात थंडीच्या दिवसांमध्ये मेकअप करताना नेहमी चमकदार मेकअप उत्पादने निवडा. मग या मेकअप उत्पादनांमध्ये विटामिन ई, विटामिन सी, विटामिन ए तसेच अँटिऑक्सिडन्स असे गुणधर्म असणे आवश्यक आहे. सोबतच मेकअप करताना तुम्ही फाउंडेशनला लावता. तर या फाउंडेशनमध्ये किंवा कन्सिलरमध्ये विटामिन सी आणि ई असणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमची त्वचा ग्लो करते आणि रफ दिसत नाही.

थंडीच्या दिवसांमध्ये मेकअप करताना सर्वात आधी तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायजर लावा आणि तुमच्या त्वचेचा मसाज करा. प्रत्येकाने दररोज आपल्या चेहऱ्याला दोन मिनिटे मॉइश्चरायजरने हलक्या हाताने मसाज करणे गरजेचे आहे. यामुळे तुमची त्वचा सॉफ्ट आणि चमकदार होण्यास मदत होते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तुमची त्वचा मुलायम होते तसेच तुमचा मेकअप देखील दिवसभर चांगला ग्लो करतो. सोबतच त्वचा मॉइश्चराइज झाल्यानंतर मेकअप केल्यानंतरही ती दिवसभर कोरडी पडत नाही.

थंडीच्या दिवसांमध्ये आपले ओठ कोरडे पडतात. तसेच महिला मेकअप करताना मॅट लिपस्टिकचा वापर करतात. पण मॅट लिपस्टिक लावल्यानंतर त्यांचे ओठ जास्त कोरडे दिसतात, त्यामुळे कधीही ओठांवर लिपस्टिक लावण्यापूर्वी थोडे लीप ग्लॉस किंवा लिपबाम लावा यामुळे तुमचे ओठ मऊ होतील. तसेच तुमचे ओठ चमकदार होतात आणि कोरडे पडत नाहीत.