घर आणि ऑफीस…तारेवरची कसरत ? वर्किंग वुमनसाठी या टिप्स आहेत बेस्ट, रहालं फिट व हेल्दी

| Updated on: Feb 21, 2023 | 9:55 AM

नोकरदार महिलांसाठी घर आणि ऑफिस एकत्र सांभाळणे खूप आव्हानात्मक असते. त्यामुळे बहुतांश महिला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत काही हेल्थकेअर टिप्स त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

घर आणि ऑफीस...तारेवरची कसरत ? वर्किंग वुमनसाठी या टिप्स आहेत बेस्ट, रहालं फिट व हेल्दी
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : सध्या रोजच्या व्यस्त जीवनशैलीत बहुतांश महिलांना स्वतःसाठी वेळ (women care) मिळत नाही. विशेषत: नोकरदार महिलांना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळणे, खूप अवघड जाते. घरातील आणि ऑफीसमधील कामांचा मेळ साधताना बहुतांश महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे (health) दुर्लक्ष होते. ज्यामुळे त्या अनेक आरोग्य समस्यांनाही बळी पडू शकतात. पण नोकरदार महिलांची इच्छा असेल तर काही सोप्या पद्धतींच्या मदतीने त्या घरातील आणि बाहेरील जबाबदाऱ्या यशस्वीपणे निभावू शकतात, तसेच स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगीही (fit and healthy) ठेवू शकतात. काही हेल्थकेअर टिप्स जाणून घेऊया, ज्याचे पालन करून महिला निरोगी जीवनशैलीचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील.

पोटभर नाश्ता करा

हे सुद्धा वाचा

कामात व्यस्त असल्यामुळे अनेक वेळा नोकरदार महिलांना नीट जेवायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत त्यांनी सकाळी पोटभर नाश्ता केला पाहिजे. यामुळे पोट तर भरेलच पण काम करताना भूकही कमी लागेल आणि त्या कोणत्याही कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतील.

सकस व निरोगी आहार घ्या

वेळेच्या व्यस्ततेमुळे महिला अनेकदा भूक लागल्यावर जंक फूड किंवा तळलेले अन्न खाऊन पोट भरतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता असते आणि त्या वारंवार आजारी पडू शकतात. म्हणूनच नेहमी घरचे पदार्थ खाण्याचा आग्रह धरा. तसेच आहारात दही, हंगामी फळे, हिरव्या भाज्या यासारख्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे महिला तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकतील.

भरपूर पाणी प्या

ऑफीसमध्ये काम करताना महिला अनेकदा कामात अडकून वेळेवर पाणी पिण्यास विसरतात. ज्यामुळे त्या डिहायड्रेशनच्या शिकार होऊ शकतात. म्हणूनच कामाच्या दरम्यान पाणी प्यायले पाहिजे. त्याच वेळी, दिवसातून 8-10 ग्लास पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड आणि ऊर्जावान ठेवू शकता.

तणावमुक्त रहा

घर आणि ऑफिसची कामे सांभाळण्याच्या प्रक्रियेत अनेक वेळा महिला तणाव घेऊ लागतात. यामुळे त्यांचा मूड तर खराब होतोच पण त्या कामातही पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे कामाच्या दरम्यान महिलांनी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. ज्यामुळे महिला तणावमुक्त राहू शकतील.

रिलॅक्सिंग थेरेपी ट्राय करा

नोकरदार महिलांना अनेकदा काम करताना थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत, कामातून 20 सेकंदांचा ब्रेक घेऊन डोळ्यांना थोडा आराम द्यावा. तसेच दर 20 ते 30 मिनिटांनी ब्रेक घेऊन थोडे चालत राहिल्यास पाठदुखीचा त्रासही टाळता येतो.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)