हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक वर्किंग वुमन ज्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि सकाळच्या घाईत टिफिनमध्ये अशा पदार्थांचा समावेश करतात ज्या त्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की निरोगी अन्न आपल्याला केवळ दिवसभर ऊर्जावान ठेवत नाही तर वारंवार होणारे आजार टाळण्यास देखील मदत करते. याव्यतिरिक्त, कामाच्या दरम्यान मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणूनच, या लेखात आम्ही ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी काही निरोगी आणि झटपट तयार होणाऱ्या टिफिन रेसिपीची आयडिया घेऊन आलो आहोत. चला जाणून घेऊयात.
व्हेजिटेबल ओट्स उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत कांदा, गाजर, मटार आणि शिमला मिरची या भाज्यांसोबत ओट्स चांगले भाजून घ्या. त्यानंतर यात गरजेनुसार पाणी घालून सोयीनुसार मसाले आणि मीठ घालून शिजवून घ्या. फायबरयुक्त ओट्स केवळ पचनसुधारत नाहीत तर दिवसभर आपल्याला ऊर्जावान देखील ठेवतात.
मूग डाळीचा चीला बनवण्यासाठी सर्वात प्रथम मूगडाळ काही तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर काहीवेळाने मिक्सरमध्ये बारीक पेस्ट तयार करा. एका भांड्यात तयार झालेली पेस्ट काढून त्यात तुमच्या आवडीच्या बारीक चिरलेल्या भाज्या घाला व त्यात मीठ मसाला घालून नीट मिक्स करा. यानंतर हे मिश्रण जास्त पातळ व जास्त घट्ट न करता मध्यम प्रमाणात तयार करा. नंतर नॉन स्टिक पॅनमध्ये हे मिश्रण टाकून माध्यम आकाराचे पोळे काढून घ्या. तयार झालेले पोळे दही किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर टिफीनला घेऊन जाऊ शकता. मुगाच्या डाळीपासून तयार केलेला हा चिला प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे.
एका भांड्यात गरजेनुसार पोहे घेऊन थोडे हलके भिजवून घ्या. त्यानंतर एका कढईत वाटाणा, गाजर, कांदा आणि टोमॅटो सारख्या भाज्यांसह परतून घ्या. यानंतर यात भिजवलेले पोहे घालून त्यात मीठ व मसाले घाला आणि छान परतून घ्या. यानंतर यात शेंगदाणे आणि लिंबाचा रस घाला. पोहा पुलाव तयार आहे. कमी वेळेत झटपट तयार होणार हा पोहा पुलाव एक हलकी आणि निरोगी टिफिन रेसिपी आहे.
क्विनोआला उकडून घ्या. त्यानंतर त्यात काकडी, टोमॅटो, शिमला मिरची आणि कोथिंबीर घाला. लिंबाचा रस आणि चवीनुसार थोडे मीठ घालून छान मिक्स करा. एक उच्च-प्रथिने, कमी-कॅलरी सलाड आहे जे वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्यामुळे झटपट हे क्विनोआ सलाड बनवून टिफिनला घेऊन जाऊ शकतात.
रात्रभर भिजवून ठेवले मिक्स कडधान्य घेऊन ते थोडे फार उकडवून घ्या. उकडलेल्या कडधान्यांमध्ये काकडी, टोमॅटो, कांदा आणि लिंबाचा रस घाला. तयार आहे तुमचं स्प्राउट्स सलाड हे प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे, ज्यामुळे ते तुमच्यासाठी एक निरोगी आणि ताजेतवाने पर्याय बनते.
ब्रेड व्हेज सँडविच बनवण्यासाठी ब्राऊन ब्रेडला पुदिन्याची हिरवी चटणी लावून घ्या. त्यानंतर त्यात तुम्ही काकडी, टोमॅटो, चीज घालून सँडविच बनवा. ते ग्रिल करा किंवा ग्रिल न करता पॅक करा. हे लवकर तयार होते आणि याच्या सेवनाने तुम्हाला दिवसभर ऊर्जा प्रदान करते.