World Breastfeeding Week 2022 : दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत ‘वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग वीक’ (World Breastfeeding Week) साजरा करण्यात येतो. लहान बालकांच्या विकासासाठी आईच्या दुधाशिवाय दुसरा कोणताही पौष्टिक आहार नसतो. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले 1 हजार दिवस अतिशय महत्वाचे असून नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीच्या (to boost immunity) वाढीसाठी जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान (Breastfeeding) करणे आवश्यक आहे. जन्मापासून किमान 6 महिने तरी मुलांना स्तनपान मिळणे गरजेचे आहे. आईच्या दुधाद्वारे त्यांच्या शरीरासाठी आवश्यक अशा सर्व पोषक तत्वांची पूर्तता होते. तुम्ही जर बाळाला स्तनपान करत असाल, तर काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ज्यामुळ तुम्हाला आणि बाळाला कोणताही त्रास होणार नाही. बऱ्याच वेळेस स्तनपान करताना बसण्याची स्थिती (positions) योग्य असणे, हेही फार महत्वाचे असते. बाळाला स्तनपान देणे हे बऱ्याच वेळेस आईसाठी थकवणारे असू शकते. त्यामुळे अशा वेळेस काही आरामदायक पोझिशन्सचा अवलंब केल्यास आईलाही आराम मिळेल व बाळाचे पोटही नीट भरेल. काही अशा पोझिशन्स बद्दल जाणून घेऊ, ज्यामुळे स्तनपानाची ही क्रिया आई व बाळ या दोघांसाठीही आरामदायक ठरू शकेल.
मेडेला डॉट कॉम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोझिशनमध्ये तुम्ही एखाद्या पलंगावर अथवा गादीवर झोपू शकता. व बाळाला तुमच्या हातात पकडू शकता. ही पोझिशन तुम्ही व तुमचे बाळ, दोघांसाठीही उत्तम आहे.
बऱ्याचशा महिला या पोझिशनचा वापर करतात. यासाठी तुम्हाला मांडी घालून ताठ बसावे लागेल. त्यानंतर बाळाला तुमच्या दोन्ही हातांमध्ये झोपवावे लागेल. यामध्ये बाळाचं डोकं व तोंड तुमच्या खांद्याजवळ असेल.
या पोझिशनमध्येही बाळाचं डोकं तुमच्या हातावर असतं. मात्र बाळाचे पाय हे तुमच्या मागील बाजूस राहतील. यामध्ये बाळाला तुमच्या अंडर आर्म्सच्या (Under Arms)मागे एखाद्या गादीवर झोपवावे लागेल.
या पोझिशनचा वापर सामान्यत: झोपताना केला जातो. दुपारच्या वेळेस किंवा रात्री झोपताना तुम्हाला व बाळालाही जास्त आरामाची गरज असते. अशा वेळेस बाळाला गादीवर झोपवावे व तुम्ही एका कुशीवर झोपावे. त्यानंतर बाळाला सहजरित्या स्तनपान करता येऊ शकेल.
जर तुमची डिलीव्हरी सी- सेक्शन म्हणजेच सिझेरियन पद्धतीने झाली असेल तर तुम्ही ही पोझिशन ट्राय करू शकाल. त्यासाठी बाळाला खांद्यावर उलटं झोपवून स्तनपान करू शकता. ही पोझिशन तुमच्यासाठी आरामदायक ठरू शकते. मात्र बाळाला नीट, व्यवस्थित रित्या पकडणे गरजेचे आहे.
( टीप : या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. )