मुंबई, जगभरातील बहुतेक लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात प्रोटीन सप्लिमेंट वाढवतात. प्रथिनांच्या संदर्भात सर्वात स्वस्त आणि पौष्टिक खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाल्यास अंडी प्रमुख स्रोत आहे. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी जगभरात अंडी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. अंडी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे (Benefits Of Egg) आहेत. अंडी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून अंड्यांचा वापर वाढवण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी, दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शुक्रवार जागतिक अंडी दिन (World Egg Day 2022) म्हणून साजरा केला जातो.
वास्तविक, जगभरात अंड्यांबाबत मांसाहार आणि शाकाहार असा संभ्रम आहे. जिथे त्याचा वापर करणारे काही लोक त्याला शाकाहारी मानतात. त्याचबरोबर काहींनी तो मांसाहारात मोडत असल्याचे सांगितले. आरोग्यदायी जीवनासाठी अंडी खाण्याबाबत जनजागृती आणि सेवन करण्यासाठी आज जागतिक अंडी दिन साजरा केला जात आहे.
जगात प्रथमच 1996 मध्ये आंतरराष्ट्रीय अंडी आयोगाच्या व्हिएन्ना परिषदेत जागतिक अंडी दिन साजरा करण्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून तो साजरा केला जात आहे. जागतिक अंडी दिन साजरा करण्यासाठी लोक आज अंड्यापासून बनवलेला पदार्थ खातात.
बऱ्याच काळापासून कोंबडी आणि अंड्याच्या उत्पत्तीवर संशोधन करत असलेल्या यूकेच्या शेफिल्ड आणि वारविक युनिव्हर्सिटीच्या एका टीमला याचे उत्तर सापडले आहे. या संशोधन पथकातील डॉ.कॉलिन फ्रीमन सांगतात की, कोंबडी जगात प्रथम आली.
डॉ. कॉलिन फ्रीमन यांच्या म्हणण्यानुसार, अंडी तयार करण्यासाठी ओव्होक्लिडिन (OC-17) नावाचे विशेष प्रोटीन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. जी गर्भधारणेदरम्यान कोंबडीच्या गर्भाशयात तयार होते. अशा परिस्थितीत अंडी नव्हे तर कोंबडी प्रथम आली हे सिद्ध झाले आहे.
कोंबडीची अंडी खाणे डोळ्यांसाठी फायदेशीर मानल्या जाते. अंड्याचे सेवन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच वेळी, त्यात भरपूर प्रथिने असतात. जे स्वस्त प्रोटीन सप्लिमेंट म्हणून काम करते. याशिवाय अंड्यांमध्ये आढळणारा पिवळा भाग हा नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी असलेल्या काही पदार्थांपैकी एक आहे.