मुंबई, लोकांच्या व्यस्त जीवनशैलीचा (Bad Lifestyle) परिणाम त्यांच्या आहार आणि जीवनशैवर पडताना दिसत आहे. परिणामी हृदयविकारही वाढत आहे. यामुळे केवळ वृद्धच नाही तर तरुणही त्याला बळी पडत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, हृदयाशी संबंधित आजारांबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन (World Heart Day 2022) साजरा केला जातो. नुकतेच आपण हृदयविकारामुळे (Heart attack) काही सेलिब्रेटींच्या मृत्यू झाल्याचे पहिले. त्यामुळे वृद्ध व्यक्तीलाच हार्ट अटॅक येतो हा गैरसमज आता दूर करायला हवा. कोणत्याही वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. विशेषतः लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारखे हृदयविकाराचे काही जोखीम घटक आहेत जे तरुणांमध्ये झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. वाईट जीवनशैलीच्या सवयी हृदयविकाराच्या जवळ घेऊन जाण्यासाठी मोठा हातभार लावत आहे.
उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि धूम्रपान या तीनच घटकांवर हृदयविकार अवलंबून असतात. त्यामुळे या घटकांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते आजकाल लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी तरुणांमध्ये अधिक आहे कारण अन्नाच्या सवयी आरोग्यास हानिकारक आहेत. बहुतेक तरुण फक्त जंक फूड आणि जास्त तेलात बनवलेल्या वस्तू खाणे पसंत करतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.
त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो आणि लहान वयातच हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराची प्रकरणे समोर येतात.