World Hemophilia Day : हीमोफिलिया म्हणजे काय ? जाणून घ्या या रोगाची मुख्य लक्षणे

| Updated on: Apr 17, 2023 | 12:03 PM

दरवर्षी 17 एप्रिल रोजी 'जागतिक हिमोफिलिया दिन' साजरा केला जातो. हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने हा विशेष दिवस साजरा केला जातो. हिमोफिलिया हा रक्ताशी संबंधित विकार आहे.

World Hemophilia Day : हीमोफिलिया म्हणजे काय ? जाणून घ्या या रोगाची मुख्य लक्षणे
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : जगभरातील कोट्यवधी लोक वेगवेगळ्या मार्गांनी आजारांशी झुंज देत आहेत. रक्ताशी संबंधित समस्या अनेकांना भेडसावत असतात. जर आपल्या रक्तामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली तर ती गंभीर परिस्थिती निर्माण करू शकते. अनेक प्रकरणांमध्ये या समस्या प्राणघातक ठरू शकतात. रक्ताशी संबंधित आजारांपैकी एक म्हणजे हिमोफिलिया (Hemophilia), जो दरवर्षी लाखो लोकांना प्रभावित करतो. या समस्येवर योग्य वेळी उपचार न केल्यास ती जीवघेणी ठरू शकते. हिमोफिलियाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 17 एप्रिल रोजी ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ (World Hemophilia Day) साजरा केला जातो. हिमोफिलिया म्हणजे काय आणि तो कोणत्या कारणांमुळे होऊ शकतो हे समजून घेऊया.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अहवालानुसार, हिमोफिलिया हा एक दुर्मिळ रक्त विकार आहे, ज्यामुळे रक्ताची व्यवस्थित गुठळी होत नाही, ते पातळ राहतं. रक्तातील प्रथिने गोठण्याच्या अनुपस्थितीमुळे असे घडते. या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना दुखापत झाल्यास त्यांचे खूप रक्त वाहू शकते. या विकारामुळे शरीराच्या आत रक्तस्राव होऊ शकतो. हिमोफिलियामुळे गुडघे, घोटे आणि कोपरांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. अंतर्गत रक्तस्त्राव तुमच्या शरीरातील अवयव आणि ऊतींना नुकसान पोहोचवू शकतो आणि जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे या आजाराबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

कशामुळे होतो हिमोफिलियाचा त्रास ?

हिमोफिलिया हा एक अनुवांशिक विकार आहे. हे अनुवांशिक कारणांमुळे उद्भवते आणि सामान्यत: मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांना याचा जास्त त्रास होतो.
जनुकातील (जिन्स) उत्परिवर्तन किंवा बदल झाल्यामुळे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेली प्रथिने उपलब्ध होत नाहीत आणि हिमोफिलियाची समस्या उद्भवते. जर एखाद्या व्यक्तीला हिमोफिलियाचा कौटुंबिक इतिहास असेल तर त्याला ही समस्या होण्याचा धोका जास्त असतो. स्क्रिनिंगद्वारे वेळोवेळी आढळून आल्यास आणि त्यावर उपचार केले गेले, तर हिमोफिलियावर नियंत्रण ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.

हिमोफिलियाची लक्षणे

– लसीकरणानंतर असामान्य रक्तस्त्राव होणे

– लघवी किंवा मलत्याग करताना रक्त येणे

– मूत्र किंवा मल मध्ये रक्त

– लहान मुलांमध्ये अस्पष्ट चिडचिड जाणवणे

– खूप मोठी किंवा खोल जखम होणे

– सांध्यांमध्ये वेदना किंवा सूज किंवा घट्टपणा

– दाताची शस्त्रक्रिया किंवा दातांवर उपचार केल्यावर जखमेतून कारणाशिवाय खूप रक्तस्त्राव होणे

– कारणाशिवाय नाकातून रक्तस्त्राव होणे

कधीकधी, अत्यंत प्रकरणांमध्ये, मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. मेंदूतील एकाच धक्क्यामुळे हिमोफिलियाच्या रूग्णांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो ज्यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते. लक्षणे अशी –

– सारखे झोपावेसे वाटणे
– आळस येणे
– दुहेरी दृष्टी
– वारंवार उलट्या होणे
– दीर्घकाळापर्यंत डोकेदुखी
– अचानक अशक्तपणा जाणवणे.