नवी दिल्ली : आपल्यापैकी बहुतेक लोकं हृदय, त्वचा, रोगप्रतिकारशक्ती, रक्तातील साखरेची पातळी राखणे या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत असं मानतात. पण तोंडाच्या आरोग्याकडे (oral care) मात्र फारसं लक्ष देत नाहीत. तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्यास श्वासाची दुर्गंधी, दातदुखी, हिरड्यांमधून रक्त येणे, फोड येणे आणि दातांच्या इतर समस्या उद्भवू लागतात. दरवर्षी 20 मार्च रोजी ‘ वर्ल्ड ओरल हेल्थ डे’ (World Oral Health Day 2023 ) साजरा केला जातो. मौखिक अथवा तोंडाच्या आरोग्याच्या समस्येबद्दल लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 894039, जीभ किंवा तोंडाच्या इतर भागांमधील समस्यांबद्दल (oral problems) लोकांनी गंभीर असले पाहिजे
‘वर्ल्ड ओरल हेल्थ डे’ द्वारे लोकांना सांगितले जाते की तोंडाच्या आतल्या स्वच्छतेचाही आपल्या जीवनात महत्त्वाचा सहभाग असतो. दररोज दात स्वच्छ केल्याने ते निरोगी राहतातच पण त्यासोबतच पौष्टिक अन्न खाल्ल्यानेही दात निरोगी आणि मजबूत होण्यास मदत मिळते. कोणत्या पदार्थांच्या सेवनाद्वारे तुम्ही तोंडाचे आरोग्य सुधारू शकता, हे जाणून घेऊया.
हे पदार्थ करत मौखिक आरोग्याचे नुकसान
केवळ योग्य देखभालीचा अभावच नाही तर अनेक प्रकारच्या अन्नामुळेही तोंडाचे आरोग्यही बिघडते, असे डॉक्टरांनी नमूद केले आहे. लहान मुलांसह प्रत्येक व्यक्तीने कमी साखर आणि पिष्टमय पदार्थ खावेत, असा सल्ला दिला जातो. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तोंडात वाईट बॅक्टेरिया निर्माण होतात आणि त्यामुळे दातदुखी किंवा तोंडाच्या आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात.
हे पदार्थ खाल्ल्याने दात होतात मजबूत
सफरचंद ठरते फायदेशीर
आरोग्याच्या अनेक फायद्यांसह सफरचंद हे तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी देखील प्रभावी आहे. तुम्ही फायबर युक्त सफरचंद देखील दात स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. तसे, त्याचे मॅलिक ॲसिड हे लाळेचे उत्पादन वाढवते जे तोंडातून बॅक्टेरिया काढून टाकते.
दूध आणि चीज
दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळते, ते दात निरोगी ठेवण्यास सहाय्यक असते. तसेच दुग्धजन्य पदार्थांमधील उच्च प्रथिनांच्या गुणवत्तेमुळे तोंडातील ॲसिडची पातळी देखील कमी होते. तसेच, जर तुम्हाला चीज खायला आवडत असेल तर ते खाऊनही तुम्ही तोंडाच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकता.
पाणी हे सर्वोत्तम
पाणी हे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे, हे वेगळं सांगण्याची तर गरजच नाही. पण हेच पाणी आपल्या दातांसाठीही सर्वोत्तम आहे. जास्त पाणी प्यायल्याने लाळेचे उत्पादन अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. त्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने दररोज कमीत कमी 2 ते 3 लिटर पाणी प्यावे.