क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. एकेकाळी या रोगाचा समावेश हा दुर्धर आणि कधीही बरा न होणाऱ्या रोगांमध्ये होत होता. मात्र आता या आजारांवर अनेक औषधोपचार (Medication) निघाल्याने हा रोग पूर्ण पणे बरा होतो. या आजाराबाबत लोकांच्या मनात आजही अनेक गौरसमज आहेत. या आजाराला टीबी म्हणून देखील ओळखले जाते. हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. या आजारात 75 % रुग्णांच्या फुफ्फुसांना बाधा होते. तर काही रुग्णांच्या इतर अवयवांवर देखील याचा परिणाम होतो. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.
क्षय रोगाचे सर्वात महत्त्वाचे आणि प्राथमिक लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, क्षय रोगाचे जिवाणू थेट व्यक्तीच्या फुफ्फसांवर परिणाम करतात. त्यामुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. भूक न लागणे, भूक न लागणे हे देखील क्षय रोगाचे लक्षण आहे, क्षय रोगामुळे तुमची भूक मंदावते. वजन कमी होणे तुम्हाला जर भूक लागत नसेल आणि वजन कमी झाले असेल तर क्षय रोग असू शकतो अशा स्थितिमध्ये डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. थकवा जाणवणे क्षय रोगात भूक लागत नाही, वजन कमी होते त्यामुळे आपोआपच थकवा जाणवतो. ताप येणे क्षय रोग असलेल्या रुग्णाला श्वास घेण्याच्या त्रासासोबच ताप देखील येते. अंगात ताप असल्याने घाम अधिक येतो. यापैकी काही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
क्षयरोगाच्या उपचारासाठी प्रभावी व गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. दोन, तीन किंवा चार औषधे एकत्रितपणे व कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. रायफामपिसिन, आयसोनिआझिड, पायराझिनामाईड, इथॅमबूटॉल, स्ट्रेप्टोमायसिन ही काही प्रतिजैविक औषधे आहेत मात्र ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. उपचारांच्या पहिल्या एक ते दीड महिन्यातच रुग्णाला चांगला गुण येतो. खोकला कमी होतो, वजन वाढू लागते, ताप येणे बंद होते. पण उपचार अर्धवट सोडून देऊ नयेत. असे केल्यास नवीन प्रकारचे क्षयरोगाचे जीवाणू शरीरात तयार होतात. व त्यामुळे औषधांना दाद न देणारा, घातक स्वरूपाचा रेझिस्टंट क्षयरोग होतो.
टीप : ही माहिती फक्त सामान्य ज्ञानाच्या उद्देशाने देण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही आजारतात औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आजारवर उपचार सुरू करा.
कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध हटवले जाणार? केंद्रीय गृह सचिवांचे राज्यांना पत्र
Aurangabad | महापालिका उभारतेय 3 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, 30 कोटी रुपयांचा निधी, लवकरच प्रस्ताव