मुंबई : आरोग्य मग ते पशूंचे असू मानवाचे ते उत्तम असले तर सर्वकाही साध्य होणार आहे. मानवाच्या आजारावर संशोधन करण्यास पशूंची मोठी भूमिका आहे आणि त्याहूनही अधिक ही (Veterinary ) पशूवैद्यकांची. बदलत्या काळाच्या ओघात यामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. (World Veterinary Day) जागतिक पशुवैद्यक दिनाचे औचित्य साधून प्राण्यांच्या आजारांशी संबंधित औषधांवर चर्चा करुन त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हाच या दिनाचा उद्देश आहे. जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त पशुवैद्यकीय रुग्णालयात (Animal) प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या जिवाणूंच्या औषधांचा प्रतिकार या विषयावर चर्चा करून लोकांना त्याबाबत जागरूक केले जाते. 2000 मध्ये जागतिक पशुवैद्यकीय संघटनेने पशुवैद्यकांचे प्राणी आणि त्यांच्या आरोग्यासाठी केलेले योगदान साजरा करण्यासाठी हा दिवस सुरू करण्यात आला.
प्राणी हे कधीकधी संभाव्य मानवी उद्रेकाची पूर्व चेतावणी देतात. प्राण्यांमधील रोगांचा पशुवैद्यकांनी योग्य मागोवा घेतल्याने पाळीव व वन्य प्राणी निरोगी राहण्यास मदत तर होते पण संबंधित रोगापासून संरक्षणाच्या अनुशंगाने लोकांमध्येही प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. पशुवैद्यकांची भूमिका ही दुतर्फा महत्वाची आहे. यामुळे पशूंचे आरोग्य तर सुरक्षित राहतेच शिवाय आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही होत आहे. जगभरातील पशुवैद्यकीय संस्था आणि पशुवैद्यक मानवी तसेच पशूंच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी आपली सेवा बजावत आहेत. आगामी काळात प्राणिजन्य आजाराबाबत जगभरात विविध पातळीवर संशोधन होत आहे. त्यामध्ये पशुवैद्यकांचा महत्त्वाचा सहभाग राहणार आहे.
पशूंचे आरोग्य व्यवस्थापनात पशुवैद्यकांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळेच आज पशूपालन व्यवसायाची जोड शेतकऱ्यांना मिळत आहे. जगभरात मुक्या प्राणी आणि पक्षांची सेवा करणाऱ्या पशूवैद्यकांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे. डॉ. जिन एडवर्ड व पाम यांच्या सहकार्यातून व वल्ड व्हेटर्नरी असोशिएशनच्या पुढाकारातून हा दिवस साजरा केला जात आहे. पूर्वी माणसांबरोबरच प्राणी आणि पक्षांना होणारे आजार, विकार आणि त्यापासून मुक्तीचे काम हे पशुवैद्यकांनीच केले आहे. प्राण्यांचे व पक्षांचे निरीक्षण करुन माहिती गोळा केली जात होती व आयुर्वेद म्हणून अस्तित्वात येऊन प्राणी, पक्षी व मनुष्याच्या उपयोगी पडली.
पशूपालन हा शेतकऱ्यांचा मुख्य जोड व्यवसाय आहे. मात्र, पशूंच्या आरोग्याला घेऊन भेडसावत असलेल्या समस्या या व्यवसयातील प्रमुख अडसर ठरत होत्या. मात्र, काळाच्या ओघात पशूवैद्यकीय सेवा ही ग्रामीण भागात तळागळापर्यंत पोहचलेली आहे. त्यामुळे पशूंच्या आरोग्यावर वेळीच इलाज होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक घडी ज्या व्यवसयामुळे बसत आहे त्यामध्ये पशूवैद्यकांची भूमिका ही महत्वाची आहे. पशूवैद्यकांनी प्राण्यांच्या आरोग्य शिक्षणावर लक्ष केंद्रीत केल्याने हा जोड व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे.
जागतिक पशुवैद्यकीय दिनानिमित्त पशूवैद्यकांचे योगदान लक्षात घेता विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने श्वान दत्तक कार्यक्रम, पशुसंवर्धन विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार, प्राणी प्रेमी व्यक्तिंकरीता- लसीकरणाचे महत्त्व, जंत निर्मूलनाचे महत्त्व, भटक्या गाढवाची उपचारादरम्यान हाताळणी, एबीसी कार्यक्रमाबाबत जनजागृती या विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
वर्ल्ड व्हेटर्नरी असोसिएशन (WVA) आणि Healthfor Animals ने 2022 च्या जागतिक पशुवैद्यक दिनाची थीम जाहीर केली आहे: पशुवैद्यकीय लवचिकता मजबूत करणे. म्हणजेच पशूंच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिकाअधिक सोई-सुविधा पुरवणे हा यंदाचा उद्देश राहणार आहे.