Heart Health : हृदयरोग हा जगभरात सध्या गंभीर आजार बनला आहे. काही दशकांपूर्वी वाढत्या वयातील व्यक्तीना हृदयाशी संबंधित आजार व्हायचे मात्र आता अगदी लहान वयातही अनेक लोकांना हार्ट ॲटॅक येतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच हृदयाच्या समस्यांचे निदान होत आहे. 2023 मधील हृदयाशी निगडीतया समस्यांवर एक नजर टाकली तर आपल्याला असे दिसून येईल की, केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये गेल्या काही वर्षांत, विशेषतः कोरोना महामारीनंतर हृदयाच्या समस्या अधिक नोंदवल्या जात आहेत. हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत, लवकरच नवं वर्ष सुरू होईल. पण हृदयाच्या आरोग्याशी संबंधित समस्या अजून कमी झालेल्या नाहीत. 2024 साली यावर नियंत्रण मिळवती येऊ शकतं. हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र या वर्षभरात फक्त हार्ट ॲटॅक नव्हे तर हृदयाशी निगडीत समस्यांनीही बराच त्रास दिला.
हार्ट ॲटॅकमुळे वाढले मृत्यूचे प्रमाण
2023 मध्ये तुम्हीही हार्ट ॲटॅकच्या घटनांबद्दल ऐकले असेल. बरेच लोकं त्याचे बळी ठरले. जानेवारीच्या सुरुवातीस, देशात सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान पंजाबमध्ये जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिलाही आलेल्या हार्ट ॲटॅकमुळे सगळे हादरले. त्यानतर तिच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली.
यावर्षी देशभरात हार्ट ॲटॅकच्या बऱ्याच केसेसची नोंद झाली. गुजरात राज्याचे शिक्षण मंत्री कुबेर दिंडोर यांनी एका अहवालात सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत राज्यात हार्ट ॲटॅकमुळे एकूण 1,052 लोक मरण पावले आहेत, त्यापैकी 80 टक्के मृत लोक 11-25 वयोगटातील होते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2022 मध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये 12.5% ची आश्चर्यकारक वाढ झाली होती, तीच गती 2023 मध्येही कायम राहिली.
कार्डिॲक अरेस्ट ठरले मृत्यूसाठी कारणीभूत
हृदयविकाराच्या झटक्याबरोबरच हृदयविकाराशी संबंधित इतर समस्यांनी देखील लोकांना यावर्षी बराच त्रास दिला, कार्डिॲक अरेस्ट हे देखील त्यापैकी एक होता. ऑगस्ट महिन्यात पेपरफ्राय कंपनीचे सह-संस्थापक अंबरिश मूर्ती यांचे लेहमध्ये कार्डिॲक अरेस्टमुळे निधन झाले, ते 44 वर्षांचे होते. तर 33 वर्षीय ब्राझिलियन इन्फ्लुएन्सर लारिसा बोर्गेस हिचाही कार्डिॲक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याचे ऐकून चाहते चक्रावले.
हार्ट ॲटॅक आणि कार्डिॲक अरेस्ट एकच नव्हे
विशेष म्हणजे हार्ट ॲटॅक आणि कार्डिॲक अरेस्ट या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट ॲटॅक हा कोरोनरी धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे येतो. मात्र या स्थितीवर उपचार न केल्यास हृदयाला रक्तपुरवठा थांबतो आणि पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय रक्त पंप करणे थांबवते तेव्हा कार्डिॲक अरेस्ट येतो. या स्थितीत रुग्णाला सामान्यपणे श्वास नीट घेता येत नाही.
एन्यूरिज्मही आहे धोकादायक
हृदयरोगाबद्दल बोलताना हार्ट ॲटॅक आणि कार्डिॲक अरेस्ट बद्दल बरीच चर्चा होते. पण एन्यूरिज्म हाही धोकादायक ठरू शकतो. जर्मन फिटनेस इन्फ्लुएन्सर आणि बॉडीबिल्डर जो लिंडनर याचा या वर्षीच जुलै महिन्यात मृत्यू झाला. तो फक्त 30 वर्षांचा होता. त्यालाही एन्यूरिज्मचा त्रास होता. एन्यूरिज्मला धमनीविस्फारही म्हटले जाते. धमन्यांच्या भिंती कमकुवत झाल्याने त्यांच्या विस्तारामुळे हा त्रास होतो.
GEN-Z वाल्यांनी रहा सतर्क
GEN-Z समूहातील लोकांमध्येही गंभीर हृदयरोग आणि हार्ट ॲटॅकचा धोका वेगाने वाढत आहे. लहान मुलं किंवा तरूणपणाच जाडेपणा असेल किंवा अधिक बीएमआय यामुळे हृदयरोगाचा त्रास वाढू शकतो.तसेच ब्लड प्रेशरच्या समस्येमुळेही हृदयरोगाचे प्रमाण वाढू शकते.
2024 मध्ये कशी घ्याल हृदयाची काळजी
हृदयाची विशष काळजी घेण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. नव्या वर्षात त्याच पालन नक्की करा.
– स्वस्थ, चांगला, पोषक आहार घ्या.
– सक्रिय रहा. नियमित व्यायाम करा.
– वजन नियंत्रणात ठेवा.
– धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळा. त्यापासून लांब रहा.
– कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यांची नियमित तपासणी करून ते नियंत्रणात ठेवा.
-ताण, तणाव घेऊ नका. तणावापासून दूर रहा.