Pre-workout Meals : जर तुम्ही फिट राहण्यासाठी वर्कआऊट (workout) करत असाल तर त्यासोबतच डाएटकडे लक्ष देणे महत्वाचे ठरते. तरच तुम्ही फिट बॉडी मेन्टेन करू शकता. तसेच वर्कआउट करण्यापूर्वी तुम्ही काय खाता हे पाहणेदेखील महत्त्वाचे असते. म्हणजेच प्री-वर्कआऊट मील असे असावे ज्यामध्ये कमी फॅट्स पण कार्बस व प्रोटीन संतुलित प्रमाणात असेल. वर्कआउट करण्यापूर्वी आपण जे काही खातो त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते आणि स्टॅमिनाही वाढतो. तसेच, तुम्ही कोणता व्यायाम करणार आहाता यावर तुमचे प्री-वर्कआउट मील अवलंबून असते.
काही लोकांना ‘फास्ट कार्डिओ’ करायला आवडते. याचा अर्थ ते धावणे, पोहणे, सायकलिंग किंवा रिकाम्या पोटीच जॉगिंग असे व्यायाम करण्यास जातात कारण यामुळे कॅलरी बर्न वेगात होते. मात्र इतरांसाठी, व्यायाम करण्यापूर्वी एक छोटा नाश्ता करणे आवश्यक आहे.
प्री-वर्कआऊट मीलचे काही हेल्दी ऑप्शन्स जाणून घेऊया
ओट्स (Oats)
तुमच्या वर्कआउट दरम्यान, ओट्स प्री-वर्कआउट मील म्हणून कार्य करते. संपूर्ण धान्याप्रमाणे, ते शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते, जे हळूहळू रिलीज होते. सोडले जाते. गोड चवीसाठी तुम्ही ओट्समध्ये ड्रायफ्रूट्स देखील घालू शकता. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते ॲव्हाकॅडो, ग्रॅनोला, केळी आणि मध घालूनही ओट्सचे सेवन करू शकता
क्विनोआ (Quinoa)
क्विनोआमध्ये फायबर, प्रथिने जास्त असतात आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. हे सर्व गुणधर्म वजन कमी करणे आणि उत्तम आरोग्याशी जोडलेले असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्री-वर्कआउट मीलमध्ये क्विनोआचा समावेश करू शकता.
ग्रीन-टी आणि ड्रायफ्रुट्स (Green tea & Dryfruits)
हर्बल टीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. ग्रीन टी हा अँटिऑक्सिडंटने समृद्ध असतो व तो चरबी जलद बर्न करण्याचे काम करतो. नियमितपणे ग्रीन टी प्यायल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते आणि मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग यासह अनेक आजारांचा धोका कमी होतो. त्यासोबत तुम्ही काही ड्रायफ्रुट्सचे सेवनही करू शकता.
पीनट बटर (Peanut Butter)
पीनट बटरमध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि झिंक यांसारखी आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजांसह चांगल्या प्रमाणात प्रोटीनही असते. ते वजन कमी करण्यासाठी उत्तम असते. म्हणूनच बॉडीबिल्डर्स आणि फिटनेस राखण्याची इच्छा असणारे लोक दररोज 2 चमचे पीनट बटर खातात.
उकडलेली अंडी (Boiled eggs)
उकडलेले अंडी ही प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहेत आणि अंड्यातील पिवळ्या बलकात भरपूर पोषक तत्वं असतात. तुमची ऊर्जेची पातळी वाढवायची असेल तर अंडी गव्हाच्या ब्रेडसोबत खाऊ शकता.
स्मूदी (Smoothies)
ताज्या स्मूदीमुळे तुम्हाला ऊर्जा तर मिळतेच शिवाय व्यायाम करण्यासाठी स्टॅमिनाही वाढतो. ही बनवणे देखील अतिशय सोपे असते. त्यातून शरीराला व्यायामापूर्वी आवश्यक असलेली पोषक तत्वं मिळतात. ऋतूमानानुसार मिळणारी फळं आणि भाज्यांचा स्मूदीमध्ये समावेश करता येतो. मात्र साखर घालणे टाळावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)