नवी दिल्ली : डोकेदुखी होणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतु हा त्रास कायम राहिल्याने खूप त्रास होतो. डोक्यात एकाच ठिकाणी सतत दुखत असेल आणि ते मर्यादेपलीकडे वाढत असेल तर त्याला मायग्रेन (Migraine) असे म्हणतात. हा त्रास इतका वाढतो की यापासून आराम मिळण्यासाठी लोकांना औषधं (medicines) घ्यावी लागतात. बिघडलेली जीवनशैली, तणाव, अपुरी झोप आणि इतर काही कारणांमुळे मायग्रेन किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
ॲलोपथीच्या औषधांव्यतिरिक्त देशी उपायांनीही डोक्याचे आरोग्य चांगले राखता येऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? मायग्रेनचा त्रास होत असेल तर काही देशी उपाय करून पहा, उपयुक्त ठरेल.
तज्ज्ञ काय सांगतात ?
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार खाण्यापिण्याची नीट काळजी घेणे, पुरेशी झोप घेणे हे मायग्रेन टाळण्याचे उत्तम उपाय आहे. मात्र तरीही हा त्रास होतच असेल तर हा घरगुती उपाय करून पहा. यामुळे दोन ते 12 आठवड्यांच्या कालावधीत तुमचा मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकेल.
मायग्रेनचे दुखणे दूर करण्यासाठी तुम्हाला धन्यांचा वापर करायचा आहे. त्यासाठी थोडे (सुमारे 5 ग्रॅम) धने घेऊन ते बारीक वाटून घ्यावेत. नंतर एका भांड्यात वाटलेली धने पावडर, एक कप दूध आणि दोन कप पाणी मिसळून ते गॅसवर ठेवावे. ते गरम करून मिश्रण निम्मे होईपर्यंत उकळावे. नंतर त्यात खडीसाखर घालावी. तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर साखर घालू नये.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तयार झालेले हे मिश्रण कोमट झाल्यावर रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. पण त्यानंतर काहीही खाऊ अथवा पिऊ नये. याचा परिणाम दिसायाल थोडा वेळ लागू शकतो, म्हणून थोडे पेशन्स ठेवा. तुम्ही हा उपाय दोन ते 12 आठवड्यांपर्यंत करू शकता. जर तुमचा डोकं मायग्रेनमुळे खूपच दुखत असेल धन्यांची पेस्ट बनवून ती कपाळावरही लावू शकता.
मायग्रेन अथवा डोकेदुखी दूर करण्याचे इतर उपाय
– जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होत असेल तर आतापासून योगासने सुरू करा. योग किंवा व्यायाम करणे शक्य नसेल तर रोज काही मिनिटे ध्यान किंवा मेडिटेशन करा. तणाव नसेल तर या समस्याही तुमच्यापासून दूर राहतील.
-तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी किंवा मायग्रेन देखील होऊ शकतो. दिवसातून एकदा व्यवस्थित हिरव्या भाज्या खा.
– सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे एक नाही तर अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपाय करण्याआधी विषयाशी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)