प्रदुषण, ऊन आणि घामामुळे त्वचेचे सौंदर्य संपते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. उन्हाळा असो किंवा पावसाळा तुमची त्वचा हायड्रेट ठेवणे सर्वात महत्त्वाचे असते. यासोबतच सखोल स्वच्छता आणि काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही त्वचा निरोगी आणि चमकदार (Healthy and shiny) बनवू शकता. चेहरा सुंदर आणि तेजस्वी बनविण्यासाठी महागडी उत्पादनेच वापरली पाहीजे असे गरजेचे नाही. तर, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कोरफड आणि मध (Aloe and honey) यांसारख्या आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करू शकता. उन्हाळ्यात लिंबू आणि टोमॅटोचा आहारात नक्कीच समावेश करा. यामुळे शरीराला भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, जे तुमची त्वचा सुंदर बनवण्यास मदत करतात. जाणून वीस रुपयांपेक्षा कमी खर्च करून, कोणते घरगुती उपाय (Home remedies) करावेत त्यामुळे, तुमची त्वचा अधिक सुंदर आणि तजेलदार बनविता येईल
आजींच्या अनेक घरगुती उपायांमध्ये बेसनाचा वापर केला जातो. बेसन नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते, जे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते. बेसन वापरण्यासाठी त्यात पाणी, दूध आणि हळद मिसळा. फेसपॅक म्हणून लावा. सुकल्यानंतर ओल्या हाताने मसाज करून चेहरा धुवा.
दुधाची साय लावल्याने चेहरा चमकू लागतो. चिमूटभर हळद पावडर आणि गुलाबपाणी दुधाच्या सायमध्ये मिसळल्याने रंग निखळ होतो. रोज मलई आणि दूध लावल्याने चेहऱ्यावरील डागही दूर होतात.
कोरफडीचे त्वचेसाठी अनेक फायदे आहेत. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे त्वचेसाठी चांगले असतात. त्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. बरेच लोक वारंवार सनबर्नची तक्रार करतात, अशा परिस्थितीत कोरफड उपयुक्त आहे. कोरफड वेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई तेल घालून, रात्रभर लावून ठेवा. चेहरा तजेलदार दिसेल.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध, हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म असतात. तुम्ही बाजारात 20 किंवा 10 रुपयांनाही खरेदी करू शकता. त्वचा चमकदार करण्यासाठी क्रीममध्ये हळद मिसळा आणि मसाज करा.
त्वचेच्या काळजीमध्ये तुम्ही पालकाचा समावेश करू शकता, ज्याला लोहाचा उत्तम स्रोत म्हटले जाते. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या पालकामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात, ज्यामध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याची क्षमता असते.
ही एक पौष्टिक भाजी आहे तसेच त्वचेचे सौंदर्य वाढवणारा घरगुती उपाय आहे. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या या घटकामध्ये पोटॅशियम देखील योग्य प्रमाणात असते. हे बाजारातून आणा आणि त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा.