Oral health : तुमच्या दातांवरुन मिळतात संपूर्ण आरोग्याचे संकेत, जाणून घ्या दातांबद्दल महत्वाचे फॅक्ट्स

| Updated on: Feb 27, 2023 | 11:56 AM

अन्न चघळणे आणि ते चावणे, केवळ हेच दातांचे कार्य नसून आपल्या एकंदर आरोग्यामध्ये दातांचा महत्वाचा सहभाग असतो. तुमची ओरल हेल्थ (मौखिक आरोग्य) सुधारायचे असेल किंवा दातांच्या अद्भूत संरचनेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हे जरूर वाचा.

Oral health : तुमच्या दातांवरुन मिळतात संपूर्ण आरोग्याचे संकेत, जाणून घ्या दातांबद्दल महत्वाचे फॅक्ट्स
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : दात हा आपल्या मानवी शरीराचा अत्यावश्यक भाग आहे. ते आपल्याला अन्न चघळण्यास (to chew food) , चावण्यास, स्पष्टपणे बोलण्यास आणि आपल्या चेहऱ्याची रचना राखण्यास मदत करतात. असे असूनही, बरेच लोक त्यांचे दात गृहीत धरतात. शरीराच्या इतर भागांच्या स्वच्छतेकडे जेवढे लक्ष दिले जाते, तेवढे लक्ष दातांकडे (dental care) दिले जात नाही. अनेक लोक बऱ्याच वेळेस दातांची योग्य काळजी आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. पण आपले दात हे एकूण आरोग्याविषयी संकेत देऊ शकतात. तसेच काही पदार्थ खरोखर दात मजबूत आणि निरोगी (for strong and healthy teeth) ठेवण्यास मदत करू शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का ? दातांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहीत असल्याच पाहिजेत, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

तुम्हाला तुमची ओरल हेल्थ (मौखिक आरोग्य) सुधारायची असेल किंवा दातांच्या अद्भूत संरचनेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर ही रंजक माहिती जरूर वाचा.

हे सुद्धा वाचा

1) जन्मापूर्वीच दात तयार होतात : बाळ जन्माला येताना त्यांच्या मुखात दात नसले तरी ते गर्भाशयातच तयार होतात. हे दात बाळाच्या जन्माआधीच विकसित होऊ लागतात आणि साधारणत: बाळ 6 ते 12 महिन्यांचे झाल्यावर ते येऊ लागतात.

2) मानवी शरीरात सर्वात कठीण पदार्थ आहे दात : आपल्या दातांवरील एनॅमल, हा मानवी शरीरातील सर्वात कठीण पदार्थ आहे. ते आपल्या हाडांपेक्षाही कठीण आहे. दातांच्या एनॅमलमध्ये आढळणाऱ्या मुख्य खनिजाला हायड्रॉक्सीपाटाइट असे म्हटले जाते.

3) ब्रेसेस किंवा अलाइनरने दात सरळ केले जाऊ शकतात : वाकडा झालेला किंवा अयोग्य स्थितीत असलेला दात हा ब्रेसेस किंवा अलाइनरने सरळ केला जाऊ शकतो. या ऑर्थोडॉन्टिक उपचारांमध्ये दात हळूहळू त्यांच्या योग्य स्थितीत हलवण्यासाठी त्यावर हलका-हलका दाब दिला जातो.

4) प्रत्येक व्यक्तीचे दात असतात वेगळे : जसे प्रत्येक व्यक्तीच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असतात, तसेच दातांचेही आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीचे दात वेगळे असतात. दातांचे कोणतेही दोन संच एकसारखे नसतात, ज्यामुळे ते ओळख पटवण्यासाठी एक उत्कृष्ट साधन ठरतात.

5) बोलण्यासाठी दात बजावतात महत्वपूर्ण भूमिका : ‘थ’ सारखा (दंतव्य) उच्चार अथवा ध्वनी (निर्माण) करण्यासाठी पुढचे दात, विशेष महत्त्वाचे असतात. हे ध्वनी निर्माण करण्यासाठी किंवा त्यांच्या उच्चारासाठी आपली जीभ पुढच्या दातांच्या मागच्या बाजूला दाबली जाते. म्हणून त्यांना दंतव्य (उच्चार) म्हटले जाते.

6) चांगल्या ओरल हायजिनमुळे दातांच्या अनेक समस्या टळू शकतात : दिवसभरात दोन वेळा नियमित दात घासणे, अंतर्गत स्वच्छता, काहीही खाल्ल्यावर खळखळून चूळ भरणे, डेन्टिस्ट अथवा दंतवैद्यांची नियमित भेट घेणे यांसारख्या चांगल्या सवयींमुळे दात किडणे, हिरड्यांच्या समस्या आणि दातांचे इतर प्रॉब्लेम्स टाळता येऊ शकतात.

7) मौखिक आरोग्य हे संपूर्ण आरोग्याशी जोडलेले आहे : खराब मौखिक आरोग्य हे हृदयरोग, मधुमेह आणि अल्झायमर रोगासह अनेक आरोग्य समस्यांशी जोडलेले आहे. आपल्या दातांची काळजी घेणे हे आपले संपूर्ण आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक आहे.

थोडक्यात काय तर दात हे आपल्या एकूण आरोग्यामध्ये अत्यावश्यक भूमिका बजावतात. आणि त्यासाठीच दातांची चांगली काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तोंडी स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून, संतुलित आहार घेतल्याने आणि नियमितपणे डेन्टिस्टकडे भेट देऊन तुम्ही तुमचे दात पुढील अनेक वर्षे निरोगी आणि मजबूत ठेवू शकता.