रात्री खोलीत झोपायला गेले होते १२ लोक, सकाळी दरवाजा उघडला तर पाया खालची जमीनच सरकली…

| Updated on: Dec 16, 2024 | 10:41 PM

एका रेस्टॉरंटच्या बेडरुममध्ये रात्री झोपलेले १२ कर्मचारी सकाळी मृतावस्थेत सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसत नसल्याने त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे कोडे पडले आहे.

रात्री खोलीत झोपायला गेले होते १२ लोक, सकाळी दरवाजा उघडला तर पाया खालची जमीनच सरकली...
Follow us on

रशियाच्या जवळील देश जॉर्जियाची राजधानी त्बिलीसीत एक भयंकर प्रकार घडला आहे. जॉर्जियातील बर्फाळ प्रांतातील गुडौरी पर्वत भागातील रेस्टॉरंटमध्ये १२ कर्मचारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने रेस्टॉरंटच्या अन्य कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या जॉर्जियाच्या सरकारने या हे मृत कर्मचारी भारतीय असून त्यांच्या मृतदेहावर जखमा किंवा कोणत्याही खुणा दिसलेल्या नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्वांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे कोडे बनले आहे.

या बर्फाळ प्रदेशातील रिसॉर्टच्या रेस्टॉरंटचा दरवाजा उघडला तेव्हा त्यात १२ जण मृतावस्थेत आढळले. हे सर्व कर्मचारी एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करीत होते. या सर्वांचा विषारी कार्बन मोनोऑक्साईड वायूने मृत्यू झाला असावा असे म्हटले जात आहे. त्बिलीसी भारतीय मिशनने म्हटले आहे की मृत्यूमूखी झालेले सर्व भारतीय नागरिक आहेत. सुरुवातीला जॉर्जियाने केलेल्या खुलाशात ११ भारतीय विदेशी नागरित आणि एक त्यांचा नागरिक मृतावस्थेत आढळल्याचे म्हटले होते. या सर्वांचे मृतदेह रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममध्ये आढळले आहेत.हे या भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी असल्याचे म्हटले जात आहेत.

जॉर्जियाच्या बर्फाळ पर्वतमय प्रदेश गुडौरीत १२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचे भारतीय मिशनने म्हटले आहे. या मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत असे त्यांनी म्हटले आहे. या मृतांच्या वारसदारांना आवश्यक ती मदत केली जाणार असल्याचे भारतीय मिशनने म्हटले आहे. या प्रकरणात जॉर्जिया तपास यंत्रणेने कलम ११६ अंतर्गत या ( हलगर्जीने मृत्यू ) या प्रकरणाचा तपास सुरु केलेला आहे.

हे सुद्धा वाचा

विजेचा जनरेटर आढळला

प्राथमिक तपासात बेडरुमच्या जवळ एका बंद जागेत एक विजेचा जनरेटर आढळला आहे. शुक्रवारी रात्री वीज गेल्याने वीज बंद झाल्याने हा जनरेटर कर्मचाऱ्यांनी सुरु केला असावा असे म्हटले जात आहे. या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा तपास फोरेन्सिकची टीम करीत आहे. स्थानिक पोलिस फोरेन्सिक टीमच्या सोबत घटनास्थळी हजर होती. या कर्मचाऱ्यांचा गॅस गळतीने गुदमरुन मृत्यू झाला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे.