जर तुम्हीही तुमच्या मुलांच्या हातात फोन देत असाल सावध व्हा ! ऑनलाइनच्या (online world) आभासी जगात मुलांवर नियंत्रण ठेवले नाही तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल. अशीच काहीशी परिस्थिती चीनमध्ये एका महिलेवर आली. चीनमध्ये एका अल्पवयीन मुलीने ऑनलाइन गेमवर (online games) इतके पैसे लुटले की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मुलीने नामी शक्कल लढवत आईचे बँक अकाऊंट रिकामं केलं. आईने बघितले तर लाखो रुपये असलेल्या खात्यात अवघे नाममात्र पैसे शिल्लक होते. ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, मध्य चीनच्या हेनान प्रांतातील ही 13 वर्षीय मुलगी सतत फोनवर गेम खेळायची. आईने तिला अनेकवेळा रोखण्याचा प्रयत्न केला पण तिने काही आईचं ऐकलं नाही. तिला स्मार्टफोनवर पे-टू-प्ले गेम्स खेळण्याचं व्यसन लागलं होतं. त्यातच तिला पैशांची गरज होती. आणि फोन आईच्या बँक अकाऊंटशी लिंक केलेल होता. मुलीने त्याचाच फायदा घेत गेमिंग अॅपही खात्याशी लिंक केले. आणि खात्यातून पैसे कापले जाऊ लागले. मात्र आईला त्याची काहीच कल्पना नव्हती. एके दिवशी त्या मुलीच्या शिक्षकाने हे उद्योग पाहिले आणि त्यांनी तत्काळ तिच्या आईला या गोष्टीची कल्पना दिली.
लाखो रुपये होते पण आता केवळ 5 रुपये उरले
हे कळल्यावर आईने तिचा बँक बॅलन्स तपासला असता डोक्यालाच हात लावायची वेळ आली. तिच्या ज्या खात्यात पूर्वी 449,500 युआन म्हणजेच सुमारे 52.71 लाख रुपये होते, त्यात आता फक्त 5 रुपये शिल्लक आहेत. चीनच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिला बँक स्टेटमेंट दाखवताना दिसत आहेत. त्यात तिच्या मुलीने ऑनलाइन गेमचे पैसे देण्यासाठी केलेल्या प्रत्येक व्यवहाराचा तपशील आहे. जेव्हा तिच्या वडिलांनी विचारले की तिने पैसे कुठे खर्च केले, तेव्हा मुलीने जे सांगितले ते ऐकून तुम्ही हैराणच व्हाल.
त्याच पैशाने 10 मित्रांसाठी गेम खरेदी केले
यातून 14 लाख रुपये देऊन ऑनलाइन गेम खरेदी केल्याचे त्या मुलीने सांगितले. फक्त स्वत:च नाही तर तिने त्याच पैशातून तिच्या 10 मित्रांसाठी गेमही विकत घेतला जेणेकरून ते एकत्र खेळू शकतील. यासाठी सुमारे 12 लाखांचा खर्च झाला. हे त्या मुलीने अतिशय निरागसपणे सांगितले, आधी मी माझ्या मित्रांना नकार दिला पण त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर मी त्यांच्यासाठी गेम विकत घेतले. मुलीने सांगितले की तिला पैसे किंवा ते कुठून आले याबद्दल फारसे काही समजत नाही. जेव्हा तिला तिचे डेबिट कार्ड घरी मिळाले तेव्हा तिने ते तिच्या स्मार्टफोनशी लिंक केले. तीआजूबाजूला नसताना तिची आई पैशांची गरज असताना तिला कार्डचा पासवर्ड सांगायची.