स्कॉटलंडमध्ये दोन भारतीयांना अटक, आठ तासांचं आंदोलन, अखेर प्रशासनाची माघार

| Updated on: May 15, 2021 | 11:12 AM

गेल्या दहा वर्षांपासून सुमीत सहदेव आणि लकवीर सिंग ब्रिटनमध्ये राहत आहेत. | 2 Indians detained in Scotland

स्कॉटलंडमध्ये दोन भारतीयांना अटक, आठ तासांचं आंदोलन, अखेर प्रशासनाची माघार
Follow us on

लंडन: इमिग्रेशनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्कॉटलंड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन भारतीय व्यक्तींना आंदोलनाच्या रेट्यामुळे सोडून देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सुमीत सहदेव आणि लकवीर सिंग या दोन तरुणांना शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी ताब्यात (2 Indians detained in Scotland )घेतले होते. या दोघांना गाडीत टाकून नेत असताना ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर या परिसरातील भारतीय मूळाच्या नागरिकांनी तब्बल आठ तास जोरदार आंदोलन केले. अखेर आंदोलनाचा रेटा आणि मानवी हक्क संघटनांच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांना या तरुणांन सोडावे लागले. (2 Indian Men Freed From Detention Van After 8-Hour Protest In Scotland)

गेल्या दहा वर्षांपासून सुमीत सहदेव आणि लकवीर सिंग ब्रिटनमध्ये राहत आहेत. सुमीत हा पेशाने शेफ आहे, तर लकवीर सिंग हा मॅकेनिक आहे. मात्र, त्यांनी इमिग्रेशनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी शुक्रवारी इमिग्रेनश विभागाचे अधिकारी ग्लासगो येथील पोलोकशिल्डस परिसरात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांसह या दोघांच्या घराजवळ पोहोचले होते.

या दोघांना गाडीत बसवून डिटेन्शन सेंटरच्या दिशेने नेत असतानाच याठिकाणी मोठा जमाव आला. यामध्ये अनेक भारतीय व्यक्तींचा समावेश होता. या जमावाने दोघांच्याही अटकेविरोधात आठ तास आंदोलन केले. अखेर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी नमते घेत या दोघांनाही सोडून दिले. यानंतर लकवीर सिंग यांनी सर्वांचे आभार मानले. अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यावर मला काय होईल याची भीती वाटू लागली होती. मात्र, लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत, असे लकवीर सिंग याने सांगितले.

‘ग्लासगो शहराच्या निर्माणात आमचा वाटा’

ईदच्या दिवशी केलेली ही कारवाई चिथावणीखोर होती. खरंतर ग्लासगोमधील नागरिकांना या लोकांच्या जीवाची चिंता आहे. हे शहर बाहेरून आलेल्या लोकांच्या सहयोगानं बनलं आहे, या लोकांनी आपले रक्त, घाम आणि अश्रू गाळले आहेत. आम्ही या लोकांसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानमधून आलेल्या आमिर अन्वर यांनी व्यक्त केली.

(2 Indian Men Freed From Detention Van After 8-Hour Protest In Scotland)