युक्रेनच्या (ukraine) खार्किव आणि सुमी येथून भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी लोकांना रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशात नेण्यासाठी 130 रशियन (russian) बसेस तयार असल्याची माहिती रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिझिनत्सेव्ह यांनी गुरुवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सध्या तिथं युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना (indian student) त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत होणार आहे. भारतासह अनेक देशातील नागरिक युक्रेनमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु रशियाने त्यांच्यासाठी बसची व्यवस्था केल्याने आता त्यांना घरी जाणं सोप्प होईल असं वाटतंय. ही माहिती रशियाच्या राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिझिनत्सेव्ह यांनी गुरूवारी जाहीर केली असल्याचं वृत्त रशियन न्यूज एजन्सीने दिलं आहे. युक्रेनमध्ये मागील 9 दिवसांपासून बॉम्ब हल्ले सुरू असल्यापासून अनेकांनी तिथं शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शंका उपस्थित केली होती.
130 Russian buses are ready to evacuate Indian students and other foreigners from Ukraine’s Kharkiv and Sumy to Russia’s Belgorod Region, Russian National Defense Control Center head Colonel General Mikhail Mizintsev announced Thursday: Russian News Agency TASS#RussiaUkraine
— ANI (@ANI) March 4, 2022
युक्रेनमधून रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशात नेण्यासाठी 130 बस
खार्किव आणि सुमी या भागात अनेक भारतीय विद्यार्थी आणि परदेशी नागरिक अडकले असल्याने रशियाने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 130 बसचे आयोजन केले आहे. रशियाकडून त्याबाबत अधिक माहिती दिलेली नाही. रशियाने बसचे नियोजन केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्कीचं आनंद होईल.
ऑपरेशन गंगा मोहिमेद्वार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यात यश
रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यापासून तिथं अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. तर अनेक विद्यार्थी दुस-या देशातून मायदेशी परतले होते. रशियाने कीव शहरावरती आक्रमण केल्यानंतर अनेकांनी तिथले व्हिडीओ शेअर करीत भीती व्यक्त केली होती. युक्रेनमधून विद्यार्थ्यांना भारतात आणण्याठी केंद्र सरकारकडून ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आलं. या मोहिमेद्वारे आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यास भारताला यश आले. ऑपरेशन गंगा 22 फेब्रुवारी सुरू करण्यात आली त्यानंतर आत्तारपर्यंत सुमारे 7000 हजार विद्यार्थी भारतात आणण्यास यश आले आहे. युक्रेनमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे. काही दिवसात युक्रेनमधून साधारण 14,000 हजार विद्यार्थी भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले आहे.
500 विद्यार्थी विमानतळावर दाखल
नवी दिल्ली विमानतळावर आज युक्रेनमधून 500 अधिक विद्यार्थी दाखल झालेत यामध्ये अनेक विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातले आहेत आणि या सगळ्यांच स्वागत करण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार या विमानतळावर दाखल झाल्या होत्या. त्यांनी भारतात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना धीर देत त्यांची आपुलकीने चौकशी केली. त्याचबरोबर केंद्र सरकारच्यावतीने त्यांना घरी पोहोचविण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान त्या संदर्भात विमानतळावरून अधिक माहिती दिली आहे.