इलोन मस्कच्या स्पेस-एक्सकडून 4 अंतराळवीर अंतराळात, इतक्या दिवसांनी अखेर परतणार

| Updated on: Aug 26, 2023 | 9:47 PM

अब्जाधीश इलोन मस्क यांच्या मालकीच्या स्पेस-एक्स कंपनीच्या रॉकेटद्वारे चार देशांच्या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात रवाना करण्यात आले आहे.

इलोन मस्कच्या स्पेस-एक्सकडून 4 अंतराळवीर अंतराळात, इतक्या दिवसांनी अखेर परतणार
elon musk spacex
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : अब्जाधीश इलोन मस्क यांची कंपनी स्पेस-एक्सने चार अंतराळवीरांना अंतराळस्थानकात रवाना केले आहे. स्थानिक वेळेनूसार 3.27 वाजता अमेरिकेतील फ्लोरिडा येथील कॅनेडी स्पेस सेंटर येथून रॉकेटमधून उड्डाण केले. स्पेस-एक्स ही अंतराळवीरांना अंतराळ पर्यटन घडविणारी खाजगी कंपनी आहे. हे अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात पोहचण्यासाठी 29 तास लागणार आहेत. तेथे यापूर्वी गेलेल्या आणि अडकून पडलेल्या चार अंतराळवीरांना पुन्हा खाली आणण्याचे कामही यानाद्वारे करण्यात येणार आहे.

स्पेस-एक्स कंपनीच्या रॉकेटद्वारे चार देशांच्या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात रवाना करण्यात आले आहे. यावेळी पहिल्यांदाच अमेरिकेतून लॉंच केलेल्या स्पेसक्राफ्टमध्ये चार आसनांवर वेगवेगळ्या देशांचे अंतराळवीर होते. नासाच्या अंतराळवीरासह डेन्मार्क, जपान आणि रशिया अशा चार देशांचे अंतराळवीर अंतराळ स्थानकात सहा महिन्याचा मुक्काम करणार असून विविध प्रयोग करणार आहे.

या स्पेसशिपमध्ये स्वार झालेल्यामध्ये मिशन कमांडर आणि नासाचे अंतराळवीर जॅस्मीन मोघबेली, युरोपीय अंतराळ एजन्सीचे अंतराळवीर मिशन पायलट एंड्रीयास मोगेंसन, जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर सातोशी फुराकावा आणि रशियन अंतराळवीर कॉन्स्टेंटिन बोरिसोव याचा समावेश आहे. मोघबेली आणि बोरिसोव यांचा हा पहिलाच अंतराळ प्रवास आहे. तर मोगेंसन आणि फुराकावा यांची दुसरीवेळ आहे. या लॉंच नंतर युरोपीयन स्पेस एजन्सीचे डायरेक्टर जोसेफ एसबाशेर यांनी म्हटले की स्पेस एक्सप्लोर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

तीन अंतराळवीर सहा महिन्यांपासून अडकले

आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशनात तीन अंतराळवीर गेल्या सहा महिन्यापासून अडकले आहेत. हे अंतरावीर यंदाच्या मार्च महिन्यात पृथ्वीवर परतणे गरजेचे होते. त्यांना आणण्यासाठी गेलेल्या स्पेसक्राफ्टचे अंतराळ स्थानकात डॉक न झाल्याने ते अडकून पडले आहेत. आता ते सप्टेंबरमध्ये त्यांना पृथ्वीवर परत आणले जाईल. यात एक अमेरिकन आणि दोन रशियन अंतराळवीर आहेत. एस्ट्रोनॉमी वेबसाईटवर दिलेल्या माहीतीनूसार आतापर्यंत 550 अंतराळवीर गेले आहेत. तर 30 अंतराळवीरांचा स्पेस मिशन दरम्यान किंवा तयारी दरम्यान मृत्यू झाला आहे. साल 2002 पर्यंत अंतराळवीरांना केवळ सरकार तर्फेच प्रशिक्षण दिले जात होते. आता इलोन मस्क यांच्या कंपनीतर्फे प्रशिक्षण दिले जात आहे.