देशाची आर्थिक राजधानीत भिकाऱ्याकडे भिक्षा मागून त्यांनी लाखो रुपयांची कॅश जमवल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. आताची ताजी ही घटना आपला कंगेहाल शेजारी पाकिस्तान येथील आहे. येथे एक आश्चर्यकारक भिकारी आढळला आहे. त्याच्या खिशातून पाच लाखांहून अधिक रक्कम सापडली आहे. हा वयोवृद्ध भिकारी रस्त्यात निपचित पडला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेते असताना पाच लाख रुपयांची रोकड त्याच्याकडे सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ टीव्हीवरील बातमीनूसार हा भिकारी पंजाब प्रांतातील आहे. पाकिस्तानच्या पंजाबातील सरगोधा जिल्ह्याच्या खुशाब रोडवर हा भिक्षेकरी बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत सापडला होता. रेस्क्यू टीमने त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे 5 लाख 34 हजार रुपये सापडले.
हा भिकारी इंटरनॅशनल आहे. कारण याच्याकडे एक पासपोर्ट देखील सापडला आहे. त्याच्या पासपोर्टवरील स्टँपमुळे त्याने अनेकदा सौदी अरबची वारी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तो सौदीत जाऊन देखील भीक मागत असावा असा संशय आहे. आम्हाला एका अनोळखी व्यक्तीने कॉल करुन सांगितले की एका रस्त्यावर एक जण निपचित पडला आहे.आम्ही या माणसाच्या सुटकेसाठी रेस्क्यू टीम पाठविल्याचे त्यांनी सांगितले. हा भिकारी आता नीट बरा झाला आहे. त्याला त्याचे सर्व साहित्य परत केले असून त्याला डिस्चार्ज देखील मिळाला आहे.
पाकिस्तानचे नागरिक उमराह व्हीसाच्या आधारे सौदीत जाऊन भीक मागण्याच्या धंदा करतात अशा बातम्या सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. पाकिस्तानी एनआयआर मंडळी आणि मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की भिकारी मानवी तस्करीच्या माध्यमातून परदेशात जातात. परदेशात अटक झालेल्यामध्ये 80 टक्के भिकारी मूळचे पाकिस्तानी नागरिक आहेत. इराक आणि सौदी अरबच्या राजदूतांनी सांगितले की अशा प्रकारच्या कारवाईमुळे तेथील तुरुंग भरलेले आहेत. सौदी अरब मस्जिद अल हरमच्या बाहेर झालेल्या कारवाईत पकडलेले अनेक पॉकेटमार मूळचे पाकिस्तानचे आहेत. हे लोक भीक मागण्यासाठी उमराह यात्रेचा व्हीसा मिळवून सौदीला भीक मागायला पोहचतात अशी माहिती त्यांनी दिली आहे.