इस्रायल आणि इराकचे युद्ध सुरु आहे. परंतू हेजबोलाचे सदस्य वापरत असलेल्या पेजर्समध्ये 17 सप्टेंबर रोजी अचानक स्फोट झाल्याने जगभर खळबळ माजली होती. यात हेजबोलाच्या 3000 हून अधिक अतिरेकी जखमी झाले आणि काही जणांचा मृत्यू झाला होता. या पेजर हल्ल्यानंतर जगाला मोठे आश्चर्याचा धक्का बसला आहे. या हल्ल्यामागे इस्रायलची मोसाद ही गुप्तहेर संघटना होती असे म्हटले जात आहे. परंतू इस्रायलने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. परंतू आता वॉशिंग्टन पोस्टने या संदर्भात नवीन खुलासा केला आहे.
इस्रायल आणि हेजबोलाची दुश्मनी सगळ्यांना माहिती आहे. परस्परांशी संवाद साधण्यासाठी हेजबोलाचे सदस्य पेजरचा वापर करायचे. मोबाईलचे संभाषण हॅक करता येते. परंतू पेजरला हॅक करणे कठीण असल्याने हेजबोलाचे लोक पेजर वापरायचे.इस्रायलला याची पूर्ण कल्पना होती की या पेजरचा वापर हेजबोला करीत आहेत. त्यामुळे त्याला टार्गेट केल्यास अधिकाधिक नुकसान होईल याची खात्री इस्रायलच्या मोसादला होते.
वॉशिंग्टन पोस्टने आपल्या अहवालात म्हटले आहे की इस्रायलला पेजर ऑपरेशनची आयडीया 2022 मध्ये सुचली होती. हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याच्याही एक वर्षे आधी या योजनेचे काही टप्पे सुरु देखील झाले होते. हेजबोला साल 2015 नंतर हॅक प्रुफ इलेक्ट्रॉनिक नेटवर्कचा शोध सुरु केला होता. अशात साल 2015 मध्ये मोसादने लेबनॉनमध्ये वॉकी टॉकी पाठविणे सुरु केले होते. हेजबोलाला वॉकी टॉकी युज करण्यासाठी प्रेरित केले जात होते. त्यासंदर्भातही इस्रायलची तयारी सुरु केली होती.
हेजबोलाला माहिती होते की पेजर इस्रायल आणि अमेरिकेसारखे देश बनवित नव्हते. त्यामुळे त्यांनी तैवान ब्रॅंडेड अपोलो पेजर्सना खरेदी केले होते. ही कंपनी इस्रायलशी जोडलेली नव्हती. तैवानच्या कंपनीला या योजनेबद्दल काही माहिती नव्हती. त्यानंतर पेजर खरेदीसाठी हेजबोलाने एका मार्केटींग ऑफिशियलची मदत घेतली होती. त्याच्याकडे अपोलो ब्रॅंडचे पेजर विक्रीचे लायसन्स होते. साल 2023 मध्ये या दोघांमध्ये हा करार झाला होता. त्यांनी हेजबोलाला AR924 पेजर्स खरेदी करायला भाग पाडले. या पेजरच्या बॅटरीत विस्फोटक लपवले होते.
या हल्ल्याच्या संदर्भात इस्रायलच्या अनेक अधिकाऱ्यांना देखील काही कल्पना नव्हती. हेजबोलाच्या वाढत्या धोक्यामुळे इस्रायलने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर एक कोड मॅसेज पाठवताच सर्व पेजर्समध्ये एकाच वेळी ब्लास्ट झाल्याचे म्हटले जात आहे.