चीनची नवी कुरापत सुरु, जमीनीत 10 हजार मीटरचा खणतोय खड्डा, रहस्य गुलदस्त्यात

| Updated on: Jun 03, 2023 | 12:55 PM

नेहमीच अकडम तिकडम कुरापती करून जगाचे लक्ष वेधणारा आपला शेजारी चीन आता पृथ्वीच्या पोटात जाणारा मार्ग खणायला सुरुवात केली आहे. काय आहे या मोहीमेचे रहस्य...

चीनची नवी कुरापत सुरु, जमीनीत 10 हजार मीटरचा खणतोय खड्डा, रहस्य गुलदस्त्यात
china
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : अमेरिकेला पाठी टाकत जागतिक महाशक्ती बनण्याची तयारी करणारा चीन आता नव्याच प्रयोगाच्या मागे लागला आहे. नेहमीच अजब सनसनाटी निर्माण करणारे प्रयोग करणाऱ्या चीनने आता पाताळाला जाणारा रस्ता तयार करण्याच्या मागे लागला आहे. चीन आता जमीनीच्या पोटात 10 हजार मीटरचा खड्डा खणत आहे. अखेर इतका मोठा खड्डा खणण्या मागचा उद्देश्य त्याने कोणाला सांगितलेला नाही.

चीन कधी चंद्रावर तर कधी मंगळावर खणन करण्याच्या योजना जाहीर करतो, तर कधी आणखी काही. आता तेलाने समृद्ध असलेल्या शिनजियांग प्रातांत त्याने खड्डा खणायचे काम 30 मे रोजी सुरू केले आहे. या मोहीमेत पृथ्वीच्या आत दहा थरांच्या आतपर्यंत खोदकाम केले जात आहे. ही अत्यंत अवघड मोहीम आहे. परंतू हा आतापर्यंतचा सर्वात मोठा खड्डा नाही. मानवाने आतापर्यंत पृथ्वीच्या पोटात खणलेला सर्वात मोठा खड्डा रशियाने साल 1989 मध्ये 12,262 मीटर इतका खोल खणला होता. इतक्या मोठ्या खड्ड्यासाठी रशियाला 20 वर्षांचा वेळ लागला होता.

अनेक वर्षांपासूनची योजना

जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनने या आधी गोबीच्या वाळवंटातून आपल्या सॅटेलाईट लॉंच सेंटरवरून तीन अंतराळ मानवांना अंतराळात पाठविले होते. मिडीया रिपोर्टनूसार चीन पृथ्वीच्या क्रेटेशियस थरापर्यंत खणणार आहे. तेथे 145 दशलक्ष वर्षे जुने थर आहेत. चीनने जरी ही मोहीम सिक्रेट ठेवली असली तरी यात नैसर्गिक खनिजांचा शोध घेणे आणि नैसर्गिक संकटांचा अभ्यास करण्याचा हेतू असू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीन अनेक वर्षांपासून ही योजना आखत होता. साल 2021 च्या एका भाषणात देखील राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या योजनेची माहीती दिली होती.

जगाच्या पोटात गोळा

चीनची ही मोहीम राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर सुरू झाली आहे, या मोहीमेमागे पृथ्वीच्या पोटात लपलेली खनिजे शोधून काढण्यासह आणि नैसर्गिक संकटांचा अभ्यास करणे हे देखील रहस्य असू शकते. शिनजियांग प्रांत हा चीनमधील तेलसाठ्याचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. 2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी तज्ज्ञांशी यावर चर्चा केली होती. आता 2023 पासून या योजनेवर काम सुरू करण्यात आले आहे. हे उत्खनन का होत आहे, याची माहिती चीन जरी जाहीर केली नसल्याने एवढा मोठा प्रकल्प सुरु केल्याने उर्वरित जगाच्या पोटात गोळा आला आहे.