वॉश्गिंटन : सँडविच( sandwich) हा सगळ्यांचाच आवडता पदार्थ. अनेक जण मोठ्या आवडीने सँडविच खातात. मात्र सँडविच खाण्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर भयंकर परिणाम झाला आहे. मागील पाच वर्षापासून हा व्यक्ती एका विचित्र समस्येचा सामना करत आहे. सँडविच खाल्ल्यापासून त्याच्या पोटात मोठ्या प्रमाणात गॅस तयार होत असून हा गॅस बाहेर पडताना पोटातून चित्र चित्र आवाज येत आहेत(Fart Problem). या समस्यामुळे हा व्यक्ती बेहाल झाला असून चार चारचौघांमध्ये वावरताना या समस्येमुळे त्याला लाजिरवाणे वाटत आहे. त्यामुळे त्याचे मनोबल खचले आहे. यामुळे या व्यक्तीने सँडविच विक्रेत्यावर खटला दाखल करत दहा लाखांच्या नुकसान भरपाईती मागणी केली आहे.
पाच वर्षांपूर्वी या व्यक्तीने एका फूड स्टॉलवरुन सँडविच खालले होते. मात्र, यानंतर त्याची प्रकृती बिघडली. यातून तो अनेक दिवसांनी बरा झाला. मात्र, यानंतर एका विचित्र समस्येने मला त्रस्त केल्याचे या व्यक्तीने सांगीतले. मागील पाच वर्षांपासून पोटात वारंवार गॅस तयार होऊन चित्र विचित्र आवाज येत असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.
‘डेली स्टार’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. टायरोन प्रेड असे या 46 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. डिसेंबर 2017 मध्ये टायरोन आपल्या पत्नी आणि मुलांसह बर्मिंगहॅम, यूके येथील ख्रिसमस मार्केटमध्ये गेला होता. येथे त्यांनी फूड स्टॉलवरून सँडविच खरेदी करून खाल्ले होते.
सँडविच खाल्ल्यानंतर पोट दुखू लागल्याचा टायरोनने दावा केला आहे. त्याच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, सँडविच खाल्ल्यानंतर काही वेळातच टायरोनला पोटदुखी, खूप ताप आणि उलट्या होऊ लागल्या. टायरोन अनेक दिवस अतिसाराने त्रस्त होता, अशक्तपणामुळे त्याला अनेक आठवडे अंथरुणावर काढावे लागले.
वकिलाने असेही सांगितले की, सँडविच खाल्ल्यानंतर टायरोनच्या पोटात गॅस तयार होऊ लागला. गॅस बाहेर पडताना वारंवार पोटातून आवाज येत असल्याने सार्वजनिक ठिकाणी लाजिरवाणे व्हावे लागते. एवढेच नाही तर त्याला निद्रानाश याचाही त्रास होत आहे. त्यांनी आता दुकानदारावर गुन्हा दाखल करून 10 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अलीकडेच या खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्या व्यक्तीच्या वकिलाने न्यायाधीशांसमोर युक्तिवाद केला.
पब्लिक हेल्थ यूकेच्या तपासणीनंतर हा फूड स्टॉल बंद करण्यात आल्याचा आरोप रॉबर्ट पार्किन यांनी केला आहे. येथून अन्न विकत घेतलेले इतर ग्राहकही आजारी पडले. सध्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.