जेरुसलेम | 28 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास दरम्यान तुंबळ युद्ध सुरु आहे. इस्रायलने गाझापट्टी बॉम्बहल्ले करुन अक्षरश: भाजून काढली आहे. त्यात इस्रायलच्या सैन्याला काल रात्री युद्धात चांगली बातमी मिळाली आहे. इस्रायल डीफेन्स फोर्सच्या ( IDF ) लढाऊ विमानांनी हमासच्या वायू दलाचा प्रमुख असेम अबू रकाबा याच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्याचा त्याचा मृत्यू झाल्याचा दावा IDF ने केला आहे. इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या खतरनाक पॅराग्लायडर हल्ल्याचे नेतृत्व अबू रकाबा यानेच केल्याचे म्हटले जात आहे.
इस्रायल डीफेन्स फोर्सने ( IDF ) सोशल साईट एक्सवर ( ट्वीटर ) या संदर्भात माहीती दिली आहे. त्यात म्हटलंय की रात्रभर IDF च्या लढाऊ विमानांनी हमासच्या एरियल टीमचा प्रमुख अबू रकाबा याच्यावर हल्ला केला आहे. अबू रकाबा याच्यावरच हमासच्या UAV ड्रोन, पॅराग्लायडर, एरियल डिटेक्शन आणि डिफेन्सची जबाबदारी होती. तोच इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या नृशंस हल्ल्याच्या योजनेत सामील होता आणि त्यानेच ड्रोन आणि पॅराग्लायडरवरुन इस्रायलमध्ये घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांच्या गटाचे नेतृत्व केले होते.
येथे पाहा ट्वीट –
Overnight, IDF fighter jets struck Asem Abu Rakaba, the Head of Hamas’ Aerial Array.
Abu Rakaba was responsible for Hamas’ UAVs, drones, paragliders, aerial detection and defense.
He took part in planning the October 7 massacre and commanded the terrorists who infiltrated…
— Israel Defense Forces (@IDF) October 28, 2023
आम्ही गाझापट्टीत शिरून आमच्या सैनिकांचा विस्तार करीत असल्याचे इस्रायलच्या सैन्याने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. आमचे सैन्य कोणत्याही नेटवर्कची मदत न घेता गाझापट्टीत शिरले असल्याचे IDF ने स्पष्ट केले आहे. इस्रायली सैन्याला शुक्रवारी चांगली बातमी मिळाली आहे. इस्रायलच्या लढावू विमानांनी हमासच्या दराज तुफाह बटालियनच्या तीन बड्या कमांडरचा खात्मा केला आहे. या कमांडरांचा 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात मोठा सहभाग होता. या अतिरेक्यांना हमासमध्ये मोठे स्थान आणि मान मिळत होता असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे.