नवी दिल्ली : अफगणिस्तानच्या (Afghanistan News) राजधानीत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला (Terroirst Attack) करण्यात आलाय. काबुलमधील (Kabul) एका गुरुद्वारावर अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात काही जण ठार झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. दहशतवादी हल्ल्यावेळी 25-30 लोकं प्रार्थना करण्यासाठी गुरुद्वारामध्ये होते, अशी माहिती मिळतेय. मात्र मृतांचा नेमका आकडा अद्याप कळू शकलेला नाही. तसंच नेमकं नुकसान किती झालंय, याचीही माहिती समोर आलेली नाही. गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर गुरुद्वाराच्या आजूबाजूचा परिसर हादरुन गेला. या हल्ल्यानं अफगणिस्तानात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. गुरुद्वारा कर्ता परवान या काबुलामधील हिंदू आणि शिखांच्या प्रार्थनास्थळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. या हल्ल्यावेळी संपूर्ण गुरुद्वाराचा परिसरच पेटवून देण्यात आला, अशी माहितीही समोर आली आहे. सध्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आलीय. या हल्ल्यामागे आयसीसी खोरासन असण्याची शंका व्यक्त केली जातेय. तर एएनआयकडून या दहशतवादी हल्ल्यानंतरचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आलाय.
स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वा सात वाजता हा हल्ला करण्यात आला. यावेळी गुरुद्वारावरील सुरक्षा रक्षकाला गोळ्या झाडण्यात आल्या. तसंत तिघा तालिबानींनाही ठार करण्यात आलं. तर हल्ला करण्याऱ्या दोघांवर तालिबानींही गोळबार केला. यावेळी सात ते आठ लोकं आतमध्ये अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. ही संख्या जास्तही असण्याची शक्यता आहे.
एकूण 25 ते 30 जण भाविक गुरुद्वारामध्ये होते. त्यापैकी दहा ते पंधरा जण बाहेर येण्यात यशस्वी झाले असून इतरजण आतमध्ये अडकले. आतमध्ये अडकलेल्या भाविकांचा मृत्यू झाल्याची आशंका व्यक्त केली जातेय. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
Explosions heard in Karte Parwan area of Kabul city. Details about the nature and casualties of this incident are not yet known: Afghanistan’s TOLOnews
— ANI (@ANI) June 18, 2022
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाकडूनही या हल्लाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय. ही घटना दुर्दैवी असून या घटनेचा आम्ही निषेध करतो, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. या घटनेकडे आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत आणि सर्व घडामोडी आमची नजर आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय.
गुरुद्वारावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधी ऑक्टोबर महिन्यातही गुरुद्वारावर हल्ला करण्यात आला होता. तसंच तिथल्या सामानाची तोडफोड करण्यात आलेली होती. सध्या हल्ला झालेल्या ठिकाणी तालिबानी सैनिक पोहोचले असून पुढील तपास आता केला जातोय.