इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण शांत बसणार की उत्तर देणार ? खामेनेई यांच्याकडे काय पर्याय ?

| Updated on: Oct 26, 2024 | 9:19 PM

इस्रायलवर 1 ऑक्टोबर रोजी इराण 200 क्षेपणास्रं डागली होती. त्याचा बदला 25 दिवसानंतर इस्रायलने घेतला आहे. ताज्या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या दहा सैन्य तळांवर हल्ले केलेले आहेत. त्यामुळे इराण आता काय करणार ? इराणकडे काय पर्याय शिल्लक आहेत?

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण शांत बसणार की उत्तर देणार ? खामेनेई यांच्याकडे काय पर्याय ?
Follow us on

इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु झाले आहे. इस्रायलने 1 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर शांत बसत 15 दिवसांनी इराणवरला प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या दहा ठिकाणांवर हल्ले केले आहे. इस्रायलने प्रथमच इराणवर हल्ला केल्याची कबूली दिली आहे. तर इराण देखील इस्रायलच्या हल्ल्याने आपले नुकसान झाल्याची कबूली दिली आहे. इस्रायलने इराणवर अचूक आणि विध्वंसक हल्ला केला आहे. त्याने तेहराण आणन अन्य सैन्य ठिकाणांना लक्ष्य केलेले आहे. इस्रायलच्या सैन्याने ( IDF ) म्हटले आहे की आमचा हेतू साध्य झाला आहे आणि इराणने जर पलटवार केला तर याचे उत्तर अधिक कठोर असेल असेही इस्रायलने म्हटले आहे. आता इराण- इस्रायल समोर काय-काय पर्याय आहेत ते पाहूयात…

इराण शांत बसणार का ?

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने शांत प्रतिक्रीया दिली आहे. इराणच्या एअर डिफेन्स फोर्सने केवळ एक संतुलित उत्तर दिले आहे. गेल्या वेळेच्या तीव्र प्रतिक्रीयेपेक्षा इराणची ही प्रतिक्रीया वेगळी आहे. या प्रतिक्रीयेवरुन इराण सावधानतेने रणनीती तयार करीत असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजे इराणने आता थेट प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. तरीही इस्रायलबाबत इराणच्या या शांत प्रतिक्रीयेला दुर्लक्षित करणे सोपे नसल्याचे म्हटले जात आहे.

इस्रायलचा हेतू काय आहे ?

इराणच्या सैनिकी आणि राजनैतिक ढाच्याला कमजोर करणे हा इस्रायलचा हेतू आहे हे स्पष्ट आहे. इराणच्या सरकारमध्ये परिवर्तन आणणे हे आमचे लक्ष्य असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी देखील या मोहीमेला आपल्या अस्तित्वाची लढाई म्हटले आहे. इस्रायलचा हेतू इराणला सैन्य आणि राजकीय दृष्टया कमजोर करण्याचा आहे. यानुसार इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्लाह खामेनेई आणि त्यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले जात आहे.

इस्रायलचा पुढला प्लान काय असणार आहे ? हे इराणची आता काय प्रतिक्रीया असणार यावर अवलंबून असणार आहे.जर इराणने पलटवार केला तर इस्रायलने स्पष्ट केले आहे की तो आणखी मोठे हल्ले करणार आहे. हमास आणि हेजबोल्लाह सारखाच इराणचे सैन्य आणि राजकीय नेतृत्व संपविण्याची रणनीती इस्रायल आखू शकतो. तसेच सामरिक हल्ले आणि सायबर हल्ले करुन इराणला खिळखिळे करु शकतो.

इराणकडे आता काय पर्याय ?

इराणकडे आता दोन पर्याय आहेत –

पलटवार करणे –

इराण इस्रायलवर ताकदीने पलटवार करु शकतो. ज्यासाठी त्याच्याकडे मोठे सैन्यदल आहे. परंतू यामुळे युद्धाचे स्वरुप गंभीर होऊ शकते.

कुटनिती आणि गुप्त कारवाई –

किंवा इराण उघडपणे हल्ले न करता कुटनीतीने गुप्त कारवाई करु शकतो. इस्रायलच्या अंतर्गत विरोधतकांना तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव वाढविण्याचा प्रयत्न करू शकतो.

सुप्रीम लीडरला घ्यावा लागणार मोठा निर्णय

गेल्या चार दशकांपासून इराणच्या सत्तास्थानी सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनेई आहेत. हमास नेता इस्माईल हानिया, याह्या सिनवार किंवा हेजबोल्लाचे नेते नसरुल्लाह या सर्वांचा इस्रायलने खात्मा केलेला आहे. आता इस्रायलच्या टार्गेटवर सुप्रीम लीडर आयातुल्ला आहेत. इराणची सध्याचे सरकार उलथवल्या शिवाय आपण शांत बसणार नाही असे इस्रायलने म्हटले आहे. इराणला ही गोष्ट माहिती आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी इराण सर्व पर्यायांवर विचार करीत आहे.