भारताच्या साथीदार शेख हसीना परागंदा होताच, बांग्लादेशने पाकिस्तानबाबत घेतला मोठा निर्णय ?

| Updated on: Aug 09, 2024 | 9:46 AM

शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर दोन दिवसानंतर पाकिस्तानने बांग्लादेशात संदर्भात महत्वाचे वक्तव्यं करीत तेथील जनतेला एकजूट होण्याचे आवाहन केले आहे.

भारताच्या साथीदार शेख हसीना परागंदा होताच, बांग्लादेशने पाकिस्तानबाबत घेतला मोठा निर्णय ?
Bangladesh
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

भारताशी मैत्री असलेल्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना विद्यार्थी आंदोलनामुळे राजीनामा देत देश सोडावा लागला. त्यानंतर लागलीच बांग्लादेशाने पाकिस्तानच्या बाबत मोठा निर्णय घेतला आहे. ढाकाने पाकिस्तानात नवीन उच्चायुक्त नियुक्त केला आहे. पाकिस्तानने बांग्लादेशचे नवीन उच्चायुक्त म्हणून मोहम्मद इकबाल हुसेन यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. अनुभवी राजकीय मुत्सुदी मोहम्मद इकबाल हुसेन आता पाकिस्तानात बांग्लादेशी उच्चायुक्त म्हणून मोहम्मद रुहुल आलम सिद्दीकी यांची जागा घेणार आहेत.

बांग्लादेशात सरकार नसताना

बांग्लादेशातील नियुक्ती अशा काळात झाली आहे. जेव्हा शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर बांग्लादेशात कोणतेही सरकार नव्हते. मंगळवारी सायंकाळी बांग्लादेशच्या राष्ट्राध्यक्षांनी नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद यूनुस यांची अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. आतापर्यंत त्यांनी शपथ घेतलेली नाही. बांग्लादेशचे लष्कर प्रमुख वकार उज-जमान यांनी बुधवारी सांगितले की युनुस देशात आल्यानंतर अंतरिम सरकारचा शपथविधी सोहळा केला जाईल.

बांग्लादेश लष्कर प्रमुखाने केली नियुक्ती ?

बांग्लादेशात कोणतेही सरकार नसताना अखेर नवीन उच्चायुक्तांची नियुक्ती कोणी केली ? बांग्लादेशाच्या लष्कराने गुपचुप सत्ता ताब्यात घेतली का ? अशी शंका उपस्थिती केली जात आहे. बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देणे, देश सोडणे आणि आता अंतरिम सरकार स्थापन करणे, याबाबत लष्कराची भूमिका महत्वाची राहीली आहे. अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी नेमलेल्या समिती सोबत भेदभाव विरोधी विद्यार्थी गटाच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी बांग्लादेशचे लष्कर प्रमुख वकार उज-जमान हे देखील उपस्थित होते.

उच्चायुक्ताच्या रुपात आपली नवीन भूमिका सांभाळण्यासाठी हुसैन लवकरच पाकिस्तानाला जाण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांच्या 15 वर्षांच्या शासनकाळात बांग्लादेशाचे पाकिस्तानशी केवळ औपचारिक संबंध राहीले आहे. शेख हसीना यांना झालेल्या मोठ्या विरोधानंतर दोन दिवसानंतर पाकिस्तानने बांग्लादेशा संदर्भात महत्वाचे वक्तव्यं करीत तेथील जनतेला एकजूट होण्याचे आवाहन केले आहे.