मुंबई : कोरोनाकाळानंतर पर्यटनात पुन्हा वाढ होत असून दक्षिण आफ्रिका भारतातून जाणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. साऊथ आफ्रिकेत पर्यटनाच्या भरपूर संधी असून हा देश 2022 मध्ये पर्यटनासाठी भारतीयासाठी आवडते डिस्टीनेशन ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेला सुटीकाळातील पर्यटन ठिकाण म्हणून मुंबईकरांनी निवडले आहे. जानेवारी-जून 2023 दरम्यान साऊथ आफ्रिकेला भेट देण्यासाठी मुंबईतून सर्वाधिक 64 टक्के आगाऊ नोंदणी झाली आहे. या देशात पर्यटनासाठी अधिक प्रोत्साहन मिळत असल्याने गेल्यावर्षी पेक्षा यंदा भारतातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये 200 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे उघड झाले आहे.
कोरोनानंतर भारतातून दक्षिण आफ्रिकेत जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेला फिरायला जाण्यासाठी जून 2023 पर्यंतचे 64 टक्के आरक्षण आधीच फुल्ल झाले असल्याचे दक्षिण आफ्रिका पर्यटन विभागाच्या नेलिस्वा नकानी ( NELISWA NKANI ) यांनी म्हटले आहे. या देशात पर्यटनासाठी अधिक प्रोत्साहन मिळत असल्याने गेल्यावर्षी पेक्षा यंदा भारतातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये 200 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे उघड झाले आहे.
भारतीय पर्यटकांसाठी आमचा देश उत्तम डेस्टीनेशन असल्याचे नेलिस्वा नकानी यांनी म्हटले आहे. रेन्बो नेशनने गेल्यावर्षी नोव्हेंबरपर्यंत जवळपास पन्नास हजार भारतीयांचे स्वागत केले आहे. सर्व जग कोरोना महासाथीतून सावरत असताना वर्षांच्या सुरुवातीला 33,900 हून अधिक पर्यटकांना दक्षिण आफ्रिकेत नेण्याचे लक्ष आहे.
मुंबईतून जास्तीत-जास्त भारतीय पर्यटक प्रवास करीत आहेत, भारतातील साऊथ आफ्रिकन टुरिझमकरिता मुंबई शहर अग्रगण्य स्रोत बाजारपेठ ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेला सुटीकाळातील पर्यटन ठिकाण म्हणून मुंबईकरांनी निवडले आहे. जानेवारी-जून 2023 दरम्यान साऊथ आफ्रिकेला भेट देण्यासाठी मुंबईतून सर्वाधिक (64%) आगाऊ नोंदणी झाली आहे. महामारी प्रादुर्भावानंतर प्रवासाच्या नियमांमधील शिथिलता ही सर्वात मोठी प्रेरणा ठरली आहे. साऊथ आफ्रिकेला परदेशातील आवडते पर्यटनस्थळ म्हणून कायम ठेवण्याकरीता पर्यटन मंडळाने इथिओपियन एअरलाइन्ससोबत धोरणात्मक करार केला आहे.त्यानूसार मुंबईकरांसाठी जोहान्सबर्ग आणि केपटाऊन प्रवासाच्या नोंदणीसाठी 31 मार्च 2023 पर्यंत अतिरिक्त ऑफरसह रू 42,139/- इतके सर्वात कमी भाडे आकारण्यात येणार आहे.
भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांना 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान, ‘साऊथ आफ्रिकन टुरिझम’ने आपला सामायिक समृद्ध वारसा आणि दोन्ही देशांना एकत्र आणणार्या आतिथ्यशील संस्कृतीबद्दल आनंद व्यक्त केला. सध्या, अनेक स्टॉप-ओव्हर फ्लाइट भारतातून दक्षिण आफ्रिकेला जातात, ज्यात एमिरेट्स, कतार एअरवेज, इथिओपियन एअरलाइन्स, केनिया एअरवेज आणि एअर सेशेल्स यांचा समावेश आहे.