दुबई : अबूधाबीवरून कालीकतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाची अबुधाबी विमानतळावर इमर्जन्सी लँडीग करावी लागल्याची घटना घडली आहे. या विमानाच्या पायलटला विमान हजार फूटावर असताना एका इंजिनातून आगीच्या ठीणग्या येत असल्याचे दिसले आणि या विमानाला पुन्हा माघारी आणण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला, त्यामुळे विमानातील 184 प्रवाशांचे प्राण बचावले आहेत.
दुबईच्या अबूधाबी विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने उड्डाण घेताच ही घटना घडली. विमान हजार फूटाच्या उंचीवर असतानाच डाव्या इंजिनाला आग लागल्याचे पायलटला दिसले. त्यानंतर पायलटने आपात्कालिन यंत्रणा सूरु केली. आणि तातडीने विमान उतरविण्याचा निर्णय घेतला.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या अबुधाबी-कालिकत फ्लाइट IX348 च्या डाव्या इंजिनला आग लागल्याने त्याचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाचे अबुधाबी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने यासंदर्भात एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘अबू धाबीहून कालिकतला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट 1 इंजिनला आग लागल्यानंतर परत आले, विमानाने अबू धाबी विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘ एअर इंडिया एक्स्प्रेस ऑपरेटिंग फ्लाइट B737-800 VT-AYC IX348 (अबू धाबी-कालिकत) 1000 फूट उंचीवर भरारी घेत असतानाच क्रमांक 1 इंजिनमध्ये आग लागली. यामुळे विमानाला अबुधाबी विमानतळावर माघारी नेत त्याची सेफ लँडींग करावी लागली, सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.