बीजिंग : गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा (Jack Ma) यांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. अलिबाबा (Alibaba) या ई कॉमर्स कंपनीचे संस्थापक असलेले जॅक मा यांचा हा व्हिडीओ चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने जारी केला आहे. जॅक मा हे ग्रामीण शिक्षणासंदर्भातील एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
ग्रामीण शिक्षक पुरस्कार सोहळ्याला जॅक मा यांनी उपस्थिती लावली. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. जॅक मा फाऊंडेशनद्वारे 2015 पासून हा सोहळा आयोजित केला जातो. दरम्यान, नुकत्याच झालेल्या या सोहळ्यात जॅक मा यांनी देशभरातील 100 ग्रामीण शिक्षकांशी संवाद साधला. कोरोना संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू असं अलिबाबांनी यावेळी शिक्षकांना सांगितलं. अलिबाबा कंपनीचं मुख्यालय याच जेजियां प्रांतात आहे. (Alibaba founder Jack Ma, who had not been seen in public appears on video released by Global Times)
श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्या जगभरातील तरुणांचे आदर्श असलेले अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतल्यापासूनच ते गायब झाल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
जॅक मा यांनी ऑक्टोबर महिन्यात शांघायमध्ये एक भाषण केलं होतं. त्यात त्यांनी जागतिक बँकिंग नियमांना ‘ज्येष्ठ नागरिकांचा क्लब’ म्हणत जोरदार टीका केली होती. तसेच चीनच्या व्याजखोर वित्तीय नियम आणि सरकारी बँकांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली होती. शिवाय चिनी कम्युनिस्ट सरकारवरही त्यांनी कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे जिनपिंग सरकारविरोधात चिनी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने जिनपिंग सरकार भडकले होते. या टीकेनंतर जॅक मा पुन्हा दिसलेच नाहीत. त्यामुळे जॅक मा गेले कुठे? असा सवाल केला जात आहे.
Jack Ma Yun, the English teacher turned entrepreneur and former executive chairman of #Alibaba, showed up at a rural teacher-themed social welfare event via video link on Wed, his first public appearance since Alibaba came under tougher regulatory scrutiny.https://t.co/VXywPHEeyv pic.twitter.com/DKCXhASIhu
— Global Times (@globaltimesnews) January 20, 2021
नोव्हेंबर 2020मध्ये जॅक यांच्या Ant Group चे 37 अरब डॉलरचे ‘इनिशियल पब्लिक ऑफरींग’ (IPO) रद्द केले होते. जॅक-माच्या या कंपनीच्या IPO ला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. हा जगातील सर्वात मोठा IPO होता. मात्र, शांघाय आणि हाँगकाँगच्या मार्केटमध्ये शेअर्सच्या यादीत केवळ 2 दिवस आधीच चीन सरकारने या IPO वर बंदी घातली.
जॅक मा यांनी इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ (Initial public offering) सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चीन सरकारने जॅक यांच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची चौकशी सुरु केल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्यास सुरुवात झाली. चीनच्या आर्थिक नियमन संस्थेने चॅक यांच्या ग्रुपो होर्मिगा कंपनीच्या आयपीओला स्थगिती देऊन चौकशी सुरु केली. यानंतर जॅक यांच्या नुकसानीस सुरुवात झाली.
विशेष म्हणजे नोव्हेंबर 2020 च्या सुरुवातीपर्यंत सर्वकाही सुरळीत सुरु होतं. जॅक इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ सुरु करणार होते. मात्र, त्याआधीच जॅक चीन सरकारच्या नजरेत आले आणि त्यांच्या अडचणींची मालिका सुरु झाली.
संबंधित बातम्या
चिनी राष्ट्रपतीशी पंगा घेणं महागात पडलं?; ‘अलीबाबा’चे जॅक मा दोन महिन्यांपासून गायब
जॅक-माच्या अलीबाबा ग्रुपच्या अडचणीत वाढ, चीन सरकारचे चौकशीचे आदेश
दररोज नव्हे तर आठवड्यातून 12 तासच काम, ‘अलिबाबा’च्या श्रीमंतीचा नवा फंडा