वॉशिंग्टन: कोरोनावरील फायझरच्या लसीला अनेक देश परवानगी देताना दिसताहेत. ब्रिटननंतर आता अमेरिका, मेक्सिको आणि बहरीन या देशांनी कोरोनाच्या लसीला परवानगी दिली आहे. त्यामुळं जगभरात थैमान घालणारा कोरोना त्याच्या अंताच्या दिशेनं वाटचाल करु लागेल, असं तज्ज्ञ सांगताहेत. अमेरिकेत कोरोनानं आतापर्यंत तब्बल ३ लाख लोकांचा जीव घेतलाय. अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागानं फायझरसह जर्मनीच्या एका लसीच्या वापराला परवानगी दिली आहे. अमेरिकेत आता लवकरच आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर आणि नर्सेसना ही लस दिली जाणार आहे. (America corona vaccination)
जगभरात लसींची मागणी पाहता, त्याची कमतरता भासण्याची भीती अमेरिकेला आहे. हेच पाहता अमेरिकेनं अतिरिक्त साठा खरेदी करण्याच्या करार केला आहे. लसीची कमतरता झाली तरी त्याचा फटका कोविड योद्ध्यांना बसू नये असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. लवकरच ब्रिटन आणि अमेरिकेत हिवाळा सुरु होईल. या काळात कोरोनाची पुन्हा लाट येऊ शकते अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करताहेत. हेच पाहता लवकरात लवकर लसीकरण मोहिम राबवण्याची तयारी करण्यात आलीय. हे अमेरिकेत राबवलं जाणारा सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. याशिवाय अमेरिकेत बनणाऱ्या मॉर्डना लसीच्या परवानगीबाबतही सरकार विचार करतंय आणि लवकरच या लसीलाही परवानगी दिली जाईल, असं कळतंय. (America corona vaccination)
मेक्सिकोमध्येही कोरोना लसीला परवानगी
तिकडं मेक्सिकोमध्येही फायझरच्या लसीला परवानगी मिळालीय. मेक्सिकोचे सहायक विदेश मंत्री ग्युगो लोपेज गोटेल यांनी ही माहिती दिली. लवकरच मेक्सिकोला लसीचे 2 लाख 50 हजार डोस मिळतील. देशातील 1 लाख 25 हजार लोकांना ही लस दिली जाणार आहे. लसीची कुठलीही कमतरता भासणार नाही असं गोटेल यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यापासून मेस्किकोमध्ये लसीकरण मोहिम सुरु होणार आहे. मेक्सिकोत आतापर्यंत 1 लाख 13 हजार लोकांना कोरोनामुळं जीव गमवावा लागलाय. (America corona vaccination)
Conferencia de prensa de la @SSalud_mx. Actualización del #COVID19 en México. Viernes 11 de diciembre de 2020. https://t.co/kr23V61hzv
— Hugo López-Gatell Ramírez (@HLGatell) December 12, 2020
संबंधित बातम्या:
Corona | दिलासादायक…27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अॅक्टिव्ह केसेस 15 हजारांपेक्षा कमी
(America corona vaccination)