भारतीय तरुणीला कारने ठोकरल्यानंतर हसणारा अमेरिकन पोलीस अधिकारी अखेर निलंबित

| Updated on: Jul 22, 2024 | 7:08 PM

या शब्दांमुळे जान्हवीच्या कुटुंबियांच्या मनावरील दु:ख मिटवता येणार नाही. मात्र या पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या कृतीमुळे सिएटल पोलिस विभाग आणि आमच्या संपूर्ण पेशाला लाज वाटत आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

भारतीय तरुणीला कारने ठोकरल्यानंतर हसणारा अमेरिकन पोलीस अधिकारी अखेर निलंबित
Jaahnavi Kandula
Follow us on

अमेरिकेत एका भारतीय तरुणीला कारने उडविल्यानंतर हसणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई झाली आहे. जान्हवी कंडुला ( वय 23 ) या भारतीय तरुणीला जानेवारी 2023 मध्ये अमेरिकन पोलिसांच्या भरधाव कारने उडविले होते. जान्हवी 100 फूटांवर जाऊन पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यावेळी संबधित कारचालक पोलिस अधिकाऱ्याच्या बॉडी कॅमेऱ्याचे फूटेज जाहीर झाले त्यावेळी हा अधिकारी अपघातानंतर हसल्याचे उघडीस आले होते. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. अखेर या अधिकाऱ्याला असंवदेनशीलता दाखविल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी 24 जानेवारी रोजी भारतीय तरुणीला पोलिसांच्या भरधाव कारने रस्ता क्रॉस करताना उडविले होते. यावेळी कारचा वेग ताशी 119 किलोमीटर इतका प्रचंड होता. त्यामुळे जान्हवी शंभर फूटावर उडून गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सीएटल पोलिस अधिकारी जोराने हसला होता. या संदर्भात संताप व्यक्त करण्यात येत होता. सिएटल पोलिस विभागाने जारी केलेल्या बॉडीकॅम फुटेजमध्ये, अधिकारी डॅनियल ऑडरर हा प्राणघातक अपघातानंतर हसले आणि त्यांनी असंवेदनशील टिप्पणी केली. ते म्हणाले यावेली म्हणाले की “अह, मला वाटते की ती हुडवर गेली, विंडशील्डला लागली आणि नंतर जेव्हा ब्रेक मारला तेव्हा कार उडून गेली… पण ती मरण पावली आहे.” अशी टिप्पणी केल्यानंतर, डॅनियल ऑडरर “चार सेकंद जोरात हसले,” असे उघडकीस आले आहे. डॅनियल यांच्यावर शिस्तभंग केल्याची कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

येथे पाहा ट्वीट –

आमच्या संपूर्ण पेशाला लाज वाटत आहे

सीएटल पोलिस डिपार्टमेंटचे अधिकारी म्हणाले की डॅनियल ऑडरर हे ऑनड्यूटी एका अमलीपदार्थासंबंधीच्या कॉल आल्याने कारने वेगाने जात होते तेव्हा त्यांच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने या जान्हवीला ठोकरले. परंतू त्यांच्या शाब्दीक टिपण्णी आणि हसण्याने कुंडला कुटुंबियाच्या भावनांना ठेच पोहचली आहे. सिएटल पोलिस विभागातील अंतरिम प्रमुख स्यू राहर यांनी एका अंतर्गत ईमेलमध्ये म्हटले आहे की ऑडरर यांच्या शब्दांनी कंडुलाच्या कुटुंबाला दुखावले आहे. या शब्दांमुळे त्यांच्या मनावरील दु:ख मिटवता येणार नाही. या पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या कृतीमुळे सिएटल पोलिस विभाग आणि आमच्या संपूर्ण पेशाला लाज वाटत आहे, त्यामुळे प्रत्येक पोलिस अधिकाऱ्यावरील जबाबदारी वाढली आहे, असे ऑडरर यांनी म्हटले आहे.

येथे पाहा पोलीस अधिकाऱ्याचा बॉडी कॅमेऱ्यातील दृश्य –