वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्यानंतर निकाल अमान्य करत पद सोडण्यास नकार देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर खुर्ची खाली केलीय. त्यांनी सहकुटुंब आज (20 जानेवारी) व्हाईट हाऊस सोडत गुड बाय केला. यावेळी केलेल्या आपल्या व्हाईट हाऊसमधील अखेरच्या भाषणात ट्रम्प काहीसे भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना धन्यवाद म्हटलं. तसेच गुड बाय म्हणत लवकरच तुम्हा सर्वांमध्ये येईल, असं आश्वासनही दिलं (American President Donald Trump Farewell speech USA).
डोनाल्ड ट्रम्प आपल्या अखेरच्या भाषणात म्हटले, “मागील चार वर्षे खूपच अद्भुत होते. या काळात खूप गोष्टी केल्या. अमेरिकेच्या नागरिकांकडून खूप प्रेम मिळालं. मला तुमचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करता आलं हे मी माझं भाग्य मानतो. आपण सैन्यात खूप बदल केले. स्पेस फोर्स तयार केली. कर रचनेत दुरुस्ती केल्या. याचा नागरिकांना खूप फायदा झाला. आम्ही अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी खूप काम केलं.”
“मी अमेरिकेसाठी कायम लढत राहिल. अमेरिकेने सर्वात आधी कोरोना लस तयार केली आणि लवकरच आपण कोविडच्या साथीरोगाला नियंत्रणात आणू. चिनी विषाणुमुळे आपण अनेक माणसांना गमावलंय. आज आपण त्या सर्वांना कायम आठवणीत ठेऊ. मी कायमच त्यांच्यासोबत आहे. गुड बाय, लवकरच तुमच्या सर्वांमध्ये परत येईल,” असंही ट्रम्प यांनी नमूद केलं.
ट्रम्प यांनी आगामी प्रशासनालाही शुभेच्छा दिल्या. तसेच उपराष्ट्रपती माईक पेंस आणि सेकंड लेडी कॅरेन पेंस आणि अमेरिकन संसद काँग्रेसचे आभार मानले. ट्रम्प आणि मेलानिया फ्लोरिडाला जाणार आहेत. त्यांनी यावेळी आपल्या कुटुंबाचेही धन्यवाद मानले आणि नेहमी लढत राहण्याची शपथ घेतली.
आगामी प्रशासनाला शुभेच्छा, पण बायडन यांचा नामोल्लेख टाळला
ट्रम्प यांनी अखेर ‘We will see you soon’ म्हणत सर्वांचा निरोप घेतला. मात्र, तत्पुर्वी त्यांनी नव्या प्रशासनाला शुभेच्छाही देताना जो बायडन यांचा उल्लेख करणं टाळलं. विमानात बसल्यानंतर त्यांचे शेवटचे शब्द होते, ‘Have a good life, we will see you soon.’ ट्रम्प यांनी आपल्या अखेरच्या काळात माध्यमांपासून अंतरच ठेवलं. सार्वजनिक ठिकाणी देखील ते कमी दिसले. कारण त्यांना या काळात दुसऱ्यांदा महाभियोगाला सामोरं जावं लागलं.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
American President Donald Trump Farewell speech USA