अनुरा दिसानायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष; आज शपथविधी पार पडणार

| Updated on: Sep 23, 2024 | 10:27 AM

Anura Kumara Dissanayake is Sri Lanka First Marxist President : अनुरा कुमारा दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. श्रीलंकेच्या यंदाच्या निवडणुकीत अनेक मुद्दे महत्वाचे ठरले आहेत. अनुरा दिसनायके यांनी सजित प्रेमदासा यांचा पराभव कसा केला? वाचा सविस्तर...

अनुरा दिसानायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष; आज शपथविधी पार पडणार
अनुरा कुमारा दिसानायके
Image Credit source: Facebook
Follow us on

श्रीलंकेत राष्ट्रध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली आहे. जेव्हीपी अर्थात मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे नेते अनुरा कुमारा दिसनायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. अनुरा दिसनायके हे डाव्या विचारांचे पुरस्कर्ते आहेत. अनुरा दिसनायके हे श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. सजित प्रेमदासा यांचा पराभव केला आहे. 57 लाख 40 हजार 179 मतं मिळवत अनुरा दिसनायके विजयी झाले आहेत. अनुरा दिसनायके यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी राष्ट्राध्यक्ष

अनुरा कुमारा दिसनायके हे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. समगी जन बलवेगया पक्षाचे नेते सजित प्रेमदासा आणि अनुरा दिसनायके या दोघांमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या फेरीच्या अखेरपर्यंत एकालाही 50 टक्केंपेक्षा जास्त मतं मिळाली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या फेरीची मतमोजणी झाली. यात अनुरा दिसनायके यांचा विजय झाला. दिसानायके यांना 42. 31 टक्के मतं मिळाली तर प्रेमदासा यांना 32.8 टक्के मतं मिळाली. या अटीतटीच्या लढतीत अनुरा दिसनायके यांचा पराभव झाला.

‘एकेडी’ सरकारचा आज शपथविधी

अनुरा दिसनायके हे ‘एकेडी’ नावाने परिचित आहेत. मार्क्सवादी जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे ते नेते आहेत. तर नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे चे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार होते. अनुरा दिसनायके हे डाव्या आर्थिक धोरणांचा पुरस्कार करतात. त्यामुळे कमी करांची मागणी त्यांचा पक्ष याआधीपासूनच करत आला आहे. 2019 ला झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनुरा दिसनायके यांना केवळ तीन टक्के मतं मिळाली होती. यंदा मात्र त्यांनी जास्तीत जास्त मतं मिळवत विजय प्राप्त केला.

श्रीलंकेच्या उत्तर- मध्य प्रांतातील ग्रामी थंबुटेगामा इथले ते रहिवासी आहेत. कोलंबोमधील केलनिया विद्यापीठात त्यांनी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलं आहे. 1987 साली अनुरा यांनी ‘जेव्हीपी’मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते श्रीलंकेच्या राजकारणात सक्रीय आहेत. भारत विरोधी बंडामध्ये ‘जेव्हीपी’ सामील होता. राजीव गांधी पंतप्रधान असताना श्रीलंका आणि भारतात झालेल्या कराराला ‘जेव्हीपी’ ने विरोध केला होता. हा श्रीलंकेच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचं ‘जेव्हीपी’चं म्हणणं होतं.