आपला शेजारील देश पाकची अर्थव्यवस्था सध्या ढबघाईला आली आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत साल 2023-24 केवळ 2.38 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर पाकिस्तानी रुपयांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचा दर सध्या 278.43 आहे. मध्यंतरी पाकिस्तानातील महागाईने उच्चांक गाठला होता. तर अशा या विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेची मदार सध्या गाढवं सांभाळत आहेत हे तुम्हाला सांगितले तर खरे वाटणार नाही ना…पण हे खरं आहे. पाकिस्तानने तब्बल 60 लाख गाढवं पाळली आहेत. या गाढवाचा पाकच्या अर्थव्यवस्थेला आधार मिळत आहे. तर पाहूयात कसा आधार मिळतोय ते. .
पाकिस्तानचा महागाई दर 29 टक्क्यांच्या पुढे गेला होता. सध्या हा दर जरा सुधारला आहे. पाकिस्तानातील 40 टक्के जनता दारिद्रय रेषेच्या खाली आहे. या पाकिस्तानला सध्या गाढवाच्या ईकॉनॉमीचा फायदा होत आहे. त्यामुळे पाकिस्तानात तब्बल 60 लाख गाढवं पाळली आहे. या इतक्या गाढवाचं पाकिस्तान करतोय काय ? सामान्यत: बांधकाम साईटवर विटा आणि रेती, माती अशी ओझी वाहण्यासाठी वापरात येणाऱ्या या प्राण्यांची संख्या 2019-2020 मध्ये 55 लाख होती. ही संख्या 2020-21 मध्ये 56 लाख, 2021-22 मध्ये 57 लाख आणि 2022-23 मध्ये 58 लाख अशी वाढतच गेल्याने आश्चर्य वाटेल. परंतू पाकिस्तानात वाढणाऱ्या गाढवांच्या संख्येला त्यांचा परममित्र चीन जबाबदार आहे. चीनशी पाकिस्तानचे व्यापारी संबंध प्रचंड वाढले आहेत. या कारण या गाढवांच्या बिझनेसमधून पाकिस्तानची परकीय गंगाजळी वाढत चालली आहे.
पाकिस्तान या गाढव पालनामुळे चीनला दरवर्षी मोठ्या प्रमाणात गाढवं निर्यात करता येतात. चीनने पाकिस्तानाला गाढवाची पैदास करण्यास भाग पाडले आहे. देशातील गाढवांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी दरवर्षी पाच लाख गाढवांची चीनला निर्यात केली जाते. यातून पाकिस्तानला रग्गड पैसा मिळत आहे. या गाढवांच्या मासांपासून चीनमध्ये मासांपासून औषधे आणि सौदर्य उत्पादने तयार करणे, डोंगराळ भागात वस्तू ने-आण करणे आदी कामे केली जातात. चीनआधी पूर्व नायझर आणि बुर्किना फासो या पश्चिम आफ्रीकन देशातून गाढवं आयात करीत होता. परंतू या दोन्ही देशांनी गाढवांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
चीनमध्ये गाढवांच्या मांसापासून जिलेटिन प्रोटीन नामक पदार्थांपासून टॉनिक आणि औषधे तयार केली जातात. यासाठी गाढवांची त्वचा वापरली जाते. जिलेटिन प्रोटीनमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म असल्याचे मानले जाते. चीनमध्ये गाढवाच्या खुरांचाही वापर केला जातो. पाकिस्तानमधून गाढवे तसेच कुत्रे आयात करण्यात चीनला रस असल्याचे पाकिस्तानचे वाणिज्य मंत्री दिनेश कुमार यांनी सांगितले आहे. पशुपालन हा पाकिस्तानच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 80 लाखाहून अधिक ग्रामीण कुटुंबे पशुपालनासंबंधीत व्यवसायात गुंतलेली आहेत.