Photos : ओबामांकडून गुड न्यूज, मुलगी बॉयफ्रेंड सोबत Live In मध्ये
बराक ओबामा यांनी एका मुलाखतीत आपली मुलगी मालिया ओबामाच्या बॉयफ्रेंडविषयी मोकळेपणाने सांगितले.
-
-
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वभावाची जगभरात चर्चा होते. ते राष्ट्राध्यक्ष म्हणून जेवढे चर्चेत राहिले तितकेच ते चांगले कौटुंबिक व्यक्ती म्हणूनही चर्चेत राहिले.
-
-
नुकताच त्यांनी आपली मुलगी मालिया ओबामाच्या बॉयफ्रेंडविषयी मोकळेपणाने सांगितले.
-
-
बराक ओबामा म्हणाले, “माझी मुलीचा बॉयफ्रेंड एक ब्रिटिश आहे आणि तो कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या काळापासून आमच्या कुटुंबासोबत राहतो आहे.” ते ‘द बिल सिमन्स पॉडकास्ट’च्या मुलाखतीत बोलत होते.
-
-
आपल्या क्वारंटीन अॅक्टिव्हिटीविषयी बोलताना ओबामा म्हणाले, “माझी मुलगी एका मुलाला डेट करत आहे. तिचा बॉयफ्रेंड कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळापासून आमच्या कुटुंबासोबत राहतो.”
-
-
असं असलं तरी ओबामा यांनी मुलीच्या प्रियकराची ओळख मात्र सांगितली नाही. असं असलं तरी हा मुलगा ब्रिटिश असल्याचं त्यांनी सांगितलं.
-
-
कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून मुलगी मलियाचा बॉयफ्रेंड आमच्या कुटुंबासोबत क्वारंटाईन झाला होता.
-
-
क्वारंटीन काळात मुलगी साशा, मालिया आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्यासोबत खूप चांगला वेळ घालवला, असंही ओबामा यांनी सांगितलं.
-
-
ओबामांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत पत्त्या खेळणं देखील शिकलं.
-
-
ओबामांनी चेष्टा मस्करीत मलियाच्या बॉयफ्रेंडचा आहार वेगळा असून या काळात कुटुंबाच्या किचनचा खर्च 30 चक्क्यांनी वाढल्याचंही सांगितलं. त्याचं जेवण पाहून आम्ही आश्चर्यचकित होतो असंही ते म्हणाले.