कधी-कधी असे काही चमत्कार घडतात की आपण ते ऐकून आपल्याला धक्का बसत असतो.एका हॉस्पिटलमध्ये एका ब्रेन डेड घोषीत झालेला व्यक्तीचे हृदय काढून दुसर्या व्यक्तीला लावले जाणार होते. त्याचे हृदय काढण्याची सर्व तयारी झाली होती. डॉक्टर चिरफाड करण्यास तयारच होते. परंतू त्याआधीच मृत घोषीत केलेली व्यक्ती जीवंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ब्रेन डेड घोषीत केलेल्या व्यक्तीचे हृदय काढून दुसऱ्या ट्रान्सप्लांट केले जात होते. तेव्हा ब्रेन डेड केलेल्या व्यक्तीच्या शरीरात हालचाल जाणवू लागली. डॉक्टर त्याचे हृदय काढणार होते. इतक्यात त्याच्यात प्राण अचानक आल्याचा प्रकार पाहून डॉक्टरही हादरले. अमेरिकेतील एका हॉस्पिटलात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. केंटकी येथील बॅपटीस्ट हेल्थ रिचमंड हॉस्पिटलात ही घटना घडली आहे. रुग्णाचे नाव थॉमस टीजे हुवर असे आहे. त्याचे वय 36 आहे.
थॉमस यास साल 2021 मध्ये ड्रगचा ओव्हरडोस झाल्याने रुग्णालयात भरती केले होते. त्यानंतर त्याला ब्रेन डेड घोषीत केले होते. ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचा मेंदू मृत झालेला असतो. त्यांच्या मेंदूला हानी पोहचल्याने ती व्यक्ती बरी होणे जवळपास कठीण असते. परंतू त्यावेळी मृत व्यक्तीच्या शरीरात जीवंतपणाची काही लक्षणे दिसू शकतात. त्याची त्वचा गरम राहाते. हृदय धडधडत असते. आणि व्हेटींलेशनमुळे छाती वर खाली होत असते. परंतू त्याच्या शरीरातील इतर अवयव दान करुन इतर रुग्णाला देता येतात. संपूर्णपणे मृत झाल्यानंतर हे अवयव दुसऱ्याच्या शरीरात लावता येत नाहीत.
केंटकी ऑगर्न डोनर एफिलिएट्स ( KODA ) चे माजी कर्मचारी निकोलेटा मार्टीन यांनी सांगितले की तो रुग्ण अचानक बेडवर इथे तिथे हात पाय मारु लागला. हे प्रत्येकाचे सर्वात वाईट स्वप्न असू शकेल की सर्जरी दरम्यान जीवंत राहाणे आणि हे जाणणे की कोणी तुमच्या शरीरातील अवयव काढून घेत आहे.हे भयानक आहे.
केंटकी ऑगर्न डोनर एफिलिएट्सच्या अन्य एक अधिकारी नताशा मिलर यानी सांगितले की थॉमस याला ICU मधून ऑपरेटींग रुममध्ये घेऊन जाताना त्याच्यात जीवंतपणाची लक्षणे दिसत होती. तो इथे तिथे हलत होता. तो धडपडत होता. जेव्हा आम्ही त्याच्याजवळ गेलो तेव्हा त्याच्याडोळ्यातून अश्रू येत होते. थॉमस त्याची बहिण डोना रोहरर हीच्या सोबत रहात होता. त्याचा स्मृतीभ्रंश आणि चालणे तसेच बोलताना त्रास होत होता.