अणूचाचण्या न करण्यासाठी बिल क्लिंटन देत होते 5 अब्ज डॉलर…नवाझ शरीफ यांचा दावा

| Updated on: Oct 22, 2023 | 2:40 PM

पाकिस्तानात परतलेले नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानात सभा घेत जनतेसमोर देशासाठी केलेल्या कामाची जंत्री वाचली आहे. पाकिस्तानाला न्युक्लीअर पॉवर बनविण्यासाठी आपण अमेरिकेच्या दबावाला देखील भिक घातली नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

अणूचाचण्या न करण्यासाठी बिल क्लिंटन देत होते 5 अब्ज डॉलर...नवाझ शरीफ यांचा दावा
nawaz sharif
Image Credit source: socialmedia
Follow us on

इस्लामाबाद | 22 ऑक्टोबर 2023 : बऱ्याच वर्षांनी आपली मायभूमी पाकिस्तानात परतणाऱ्या माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लाहोर मध्ये एक सभा घेऊन राजकीय भाषण केले आहे. आपल्या कारकीर्दीत भारताला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आपण अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन 5 अब्ज डॉलर देत असतानाही अणू चाचण्या घेतल्या असा दावा नवाझ शरीफ यांनी केला आहे. आपल्या कारकीर्दीत पाकिस्तानच्या जनतेसाठी केलेल्या कामाचा आलेखच त्यांनी यावेळी वाचला.

नवाझ शरीफ पुढे म्हणाले की, ही गोष्ट 1999 सालची आहे. परराष्ट्र कार्यालयात हा रेकॉर्ड जरूर असेल. बिल क्लिंटन यांनी मला 5 अब्ज अमेरिकन डॉलर देण्याचा प्रस्ताव सादर केला. परंतू मी पाकिस्तानी जमीनीवर जन्मलेला सच्चा पाकिस्तानी असल्याने माझ्यासमोर कोणी पाकिस्तान विरोधात कोणाला बोलण्याची परवानगी नाही आपण तो प्रस्ताव फेटाळाल्याचे त्यांनी सांगितले.

भारताला आम्ही योग्य उत्तर दिले – नवाझ शरीफ

आम्ही अणूचाचण्या करुन भारताला तोडीस तोड उत्तर दिले असल्याचे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. अणू चाचण्या करु नका म्हणून अमेरिकेने दबाव आणला, हजारो कोटी रुपयांची ऑफर दिली. परंतू आपण पैसे स्वीकारले नाही आणि भारताला जोरदार प्रत्त्युत्तर दिले.

पाकिस्तानाला अणूशक्ती संपन्न देश बनविले

आपल्या जवळपास एका तासांच्या भाषणात नवाझ शरीफ यांनी पुढे सांगितले की आम्हाला या कारणासाठी शिक्षा मिळत आहे ? का यासाठी आमच्या विरोधात निकाल दिले जात आहेत ? आपण कधी आपल्या समर्थकांना धोका दिला नाही. ना कुठल्या बलिदानापासून लांब पळालो. माझ्या आणि माझ्या पार्टीच्या नेत्यांवर खोट्या केसेस टाकण्यात आल्या. परंतू कोणीच पीएमएलचा झेंडा सोडलेला नाही. आम्ही ते लोक आहोत ज्यांनी पाकिस्तानला तयार केले. आम्ही पाकिस्तानाला अणूशक्ती संपन्न देश बनविले असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. इमरान खान यांचे नाव न घेता आपल्या जागी कोणी अन्य नेता असता तर तुम्हीच सांगा तो अमेरिकेपुढे बोलू शकला असता का ? असा सवालही शरीफ यांनी यावेळी केला.